Manasvi Choudhary
रोजच्या कामाच्या धावपळीतून घरातील छोट्या छोट्या गोष्टी स्वच्छ करायला वेळ मिळत नाही. यासाठी अनेक महिला विकेंडला घराची साफसफाई करतात.
अनेक महिला संपूर्ण घर स्वच्छ करतात मात्र स्विच बोर्ड साफ करायला घाबरतात त्यांना विजेचा धक्का बसण्याची भिती असते.
मात्र यामुळे वर्षोनवर्षे स्विच बोर्डवर धूळ तशीच राहते आणि तो काळकुट्ट दिसतो. यामुळे स्विचबोर्ड साफ करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी मुख्य स्विच बोर्ड बंद करणे आवश्यक आहे.
घरातील बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साइडच्या मदतीने तुम्ही घरातील स्विच बोर्ड सहज स्वच्छ करू शकता.
कापड किंवा ब्रशवर पावडर लावून त्याने स्विचबोर्ड घासा यामुळे स्विच बोर्ड पांढरा शुभ्र होईल.
स्विच बोर्ड साफ केल्यानंतर साधारणपणे ४० ते ४५ मिनिटे स्विच चालू करू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.