Dhurandhar Controversy: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. या स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपटात उत्कृष्ट कलाकार आहेत. ज्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. चित्रपटगृहे भरलेली आहेत आणि बॉक्स ऑफिसवर धुरंधरची प्रचंड कमाई सुरु आहे.
५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'धुरंधर'ने केवळ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही तर प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही प्रशंसा मिळवली आहे. पण, काही जण या चित्रपटावर टीका देखील करत आहेत, तर काही जण सोशल मीडियावर याला इस्लामोफोबिक म्हणत आहेत.
धुरंधर वादावर गौरवची प्रतिक्रिया
अभिनेता गौरव गेराने आता धुरंधरवरील टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटात गौरव गुप्तहेर आणि स्पाय मोहम्मद आलमची भूमिका साकारत आहे. झूमशी झालेल्या मुलाखतीत त्यांनी धुरंधरबद्दल सुरु असलेल्या वादावर आपले मौन सोडले आणि लोकांना प्रथम चित्रपट पाहण्याचे आणि नंतर त्याचे मत मांडण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, "मी त्या लोकांना फक्त हे सांगू इच्छितो की कृपया आधी चित्रपट पाहा. मला एक सोशल मीडिया पोस्ट आठवते त्यामध्ये म्हटले होते की, 'धुरंधरने भारतीय चित्रपटाची नवी सुरुवात आहे. मी ते येथे नमूद करू इच्छितो. असे चित्रपट कधी कधीच येतात आणि आदित्य धर चित्रपटसृष्टीत उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहे.
धुरंधर २ कधी येणार आहे?
धुरंधर २ च्या प्रदर्शनाची तारीख धुरंधरच्या प्रदर्शनासोबतच जाहीर करण्यात आली. तीन महिन्यांनंतर चित्रपटगृहात येणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल गौरव म्हणाला, "मी तुम्हाला एवढेच आश्वासन देऊ शकतो की धुरंधर २ गोष्टींना एका मोठ्या पातळीवर घेऊन जाईल.'' ९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणारा धुरंधर २ यश अभिनीत 'टॉक्सिक' चित्रपटाशी टक्कर देईल. गौरव म्हणाला की एक चांगला चित्रपट नेहमी स्वतःचा प्रेक्षक निर्माण करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.