Famous Actor Death : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actor Passes Away : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेत्याने वयाच्या 56 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Famous Actor Passes Away
Famous Actor DeathSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्याचे हार्ट अटॅकने निधन

वयाच्या 56 व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

अभिनेते राष्ट्रीय पुरस्कार विजेते होते

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते मल्याळम अभिनेते आणि दिग्दर्शक सलीम कुमार (Salim Kumar) यांचे ६ जूनला निधन झाले. ६ जूनला रात्री कोची येथील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टी आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. तसेच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

'न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, सलीम कुमार यांना यकृताचा सिरोसिस (liver cirrhosis) हा आजार होते. काही वर्षांपूर्वी यकृताचा सिरोसिस असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची (Liver transplant) शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र, शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.

मल्याळम चित्रपटसृष्टीतील कलाकार, मनोरंजन विश्वातील कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. १९६९ मध्ये पारवूर येथे जन्मलेल्या सलीम कुमार यांनी आपल्या कलाप्रवासाची सुरुवात 'मिमिक्री' कलाकार म्हणून केली. १९८० आणि १९९० च्या दशकात केरळमध्ये बहरलेल्या मिमिक्रीच्या मंचावरून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते सलीम कुमार यांनी दिग्दर्शक आणि लेखक म्हणून कॅमेऱ्याच्या मागेही काम केले आहे. त्यांच्या 'करुथा जूथन' (Karutha Joothan) या चित्रपटाला २०१७ मध्ये सर्वोत्तम कथेसाठी केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. मल्याळम चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९९७ मध्ये 'इष्टमानु नूरु वट्टम' (Ishtamanu Nooru Vattam) या चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयात पदार्पण केले. 'सत्यमेव जयते' (Sathyameva Jayathe) आणि 'थेनकासीपट्टनम' (Thenkasipattanam) यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली.

Famous Actor Passes Away
Deool Band 2 Collection : पैसाच पैसा! प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' थिएटरमध्ये घालतोय धुमाकूळ; १०० कोटींपासून काही पावले दूर, कमाई किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com