प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर हल्ला
३० लोकांच्या टोळीने अभिनेत्यावर हल्ला केला.
मनोरंजन विश्व हादरले.
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेला मराठी अभिनेता अंकुर विठ्ठलराव वाढवे आहे. नुकताच अंकुरवर मोठा हल्ला झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने ही बातमी दिली आहे.
अंकुरने केलेल्या पोस्टनुसार, २९ मे २०२६ रोजी पुसद येथे अभिनेत्यावर हल्ला झाला. २०-३० लोकांच्या टोळीकडून हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण वसंतनगर पोलीस स्टेशनला पोहचले. पोलीसांमुळे मोठा अनर्थ टळला आणि प्रकरण सावरले गेले. मात्र जीवघेण्या हल्ल्यामुळे अभिनेत्याचा संताप झाला आहे. त्याने सोशल मीडियावर कठोर शब्दात पोस्ट शेअर करून, घडलेला प्रकार सांगितला आहे.
अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहते कमेंटस करून अभिनेत्याला पाठिंबा देत आहेत. तसेच घडलेल्या प्रकाराबद्दल राग-संताप व्यक्त करत आहे. अभिनेत्याच्या तब्येतीची चौकशी देखील करताना दिसत आहेत.
अंकुर वाढवे हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. अंकुर वाढवेचा सोशल मिडिया खूप मोठा चाहता वर्ग आहे. चाहते आता अंकुर वाढवेच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.