हा आक्रोश आहे.. विषारी दारूमुळे जीव गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबाचा....पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूनं तब्बल एक दोन नव्हे तर 14 कुटुंब उद्धवस्त केली... अवघ्या दोन दिवसात विषारी दारूमुळे तब्बल 14 जणांचा बळी घेतलाय.. आरोपी योगेश वानखेडेनं मुंबईवरून इथेनॉल आणून त्यापासून विषारी दारू तयार केली होती...ही इथेनॉल मिश्रित दारु आरोपीनं 4 विक्रेत्यांना पुरवली... हे विक्रेते फुगेवाडी, दापोडी, हडपसर, चतुर्श्रुंगी परिसरातील होते... त्यामुळे ही विषारी दारू पिऊन फुगेवाडीत 9 जणांचा तर हडपसरमध्ये 5 जणांचा जीव गेलाय...
दरम्यान या घटनेनंतर नातेवाईक संतप्त झाले असून अवैध दारुच्या अड्ड्यांवर कारवाई का केली जात नाही? असा सवाल ते विचारत आहे. दुसरीकडे पुण्यातील हडपसर परिसरात पांढरे मळा इथं असलेला दारूचा अड्डा स्थानिक नागरिकांनी उद्ध्वस्त केलाय.. आता प्रश्न हा आहे की पुण्यासारख्या शहरात अवैधपणे हातभट्ट्या सुरू असतील तर पोलीस नेमक करतायेत तरी काय.. अवैध दारूसंदर्भात 1 हजारहून अधिक तक्रारी दाखल झाल्याची कबुली देत एकप्रकारे पोलीस आयुकांनी प्रशासनाची अकार्यक्षमताच दाखवून दिलीय..
दुसरीकडे याप्रकरणात कोणाचीही गय करू नका, कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिलेत... झपाट्यानं वाढणाऱ्या पुण्याची ओळख आता गँगवॉरचं आणि कोयता गॅंगचं शहर म्हणून होत आहे. पुण्यात मिथेनॉल सहज उपलब्ध होते.. त्याचे शहरात 4 वेगवेगळ्या भागात वितरण होतं..त्याच्यापासून दारू बनते तरी पोलिसांना याची साधी खबरही कशी लागत नाही...स्थानिक पोलिस प्रशासन इतकी मोठी घटना घडेपर्यंत नेमकं काय करत होतं.. अनेक वर्षांपासून चालणाऱ्या या छुप्या अड्ड्यांची पोलीसांना कशी माहिती नाही. विषारी दारू विकून नागरिकांचे बळी जाण्याच्या या घटनेला आरोपींसह पोलिसांचा हलगर्जीपणाही तेवढाच कारणीभूत नाही का?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.