Thane : भिवंडीत तुफान हाणामारी, दुचाकीच्या वादावरून तरुणाला चोपलं, वाचवायला आलेल्या कुटुंबियांवर हल्ला

Thane Bhiwandi News : भिवंडीतील चव्हाण कॉलनी परिसरात दुचाकीच्या नुकसानावरून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत पाच जण जखमी झाले. शांतीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
BHIWANDI CLASH OVER DAMAGED TWO-WHEELER LEAVES FIVE INJURED, TWO CRITICAL
BHIWANDI CLASH OVER DAMAGED TWO-WHEELER LEAVES FIVE INJURED, TWO CRITICALSaam Tv
Published On
Summary
  • भिवंडीत दोन गटांमध्ये हाणामारी

  • या घटनेत पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर

  • जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू

  • घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण

फय्याज शेख, भिवंडी

भिवंडीतील चव्हाण कॉलनी परिसरात दुचाकीच्या नुकसानाच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका युवकाची दुचाकी काही तरुणांकडून चुकून पाडली गेली. या घटनेत दुचाकीचे नुकसान झाले. वाहनाचे नुकसान झाल्यानंतर संबंधित युवकाने त्या तरुणांना जाब विचारला. तसेच नुकसान झालेल्या वाहनाची भरपाई देण्याची मागणीही केली. मात्र, या गोष्टीचा राग मनात धरून काही तरुणांनी त्याच्याशी वाद घालत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

BHIWANDI CLASH OVER DAMAGED TWO-WHEELER LEAVES FIVE INJURED, TWO CRITICAL
Kitchen Hacks : तुम्हीसुद्धा रात्रीचा शिळा भात खाताय? खाण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात नाहीतर...

मारहाण वाढत असल्याचे पाहून संबंधित युवकाने आपल्या कुटुंबीयांना मदतीसाठी घटनास्थळी बोलावले. काही वेळातच त्याचे वडील आणि भावंडे घटनास्थळी पोचली. मात्र, वाद मिटण्याऐवजी परिस्थिती अधिकच चिघळली. संतप्त झालेल्या तरुणांनी युवकाच्या कुटुंबीयांनाही मारहाण केली. लाकडी दांडे आणि दगडांचा वापर करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मलंग शेख आणि त्यांचा मुलगा मुस्तकीम शेख गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

BHIWANDI CLASH OVER DAMAGED TWO-WHEELER LEAVES FIVE INJURED, TWO CRITICAL
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

याशिवाय शहानूर शेख, अमीर शाहिद आणि मेहबूब शेख हे देखील जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन गट आमनेसामने आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोन्ही गटांतील संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com