Famous Actor : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

Famous Actor Mother Death : प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन झाले. अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Famous Actor Mother Death
Famous ActorSAAM TV
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

अभिनेत्याच्या डोक्यावरून मातृछत्र हरपले

अभिनेत्याच्या आईने वयाच्या 85 वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजनसृष्टी शोकसागरात बुडाली. तमिळ सुपरस्टार अजित कुमार (Tamil actor Ajith Kumar) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची आई मोहिनी मणी (Mother Mohini Mani Death) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या आईच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच कलाकार आणि प्रेक्षकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

IANS च्या वृत्तानुसार , वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्याच्या समस्यांमुळे चेन्नई येथे अजित कुमार यांच्या आईचे निधन झाले. असे बोले जाते की, आईच्या निधनाच्या दरम्यान अभिनेता प्रवासात (देशाबाहेर) होता, मात्र ही बातमी समजताच तो तातडीने घरी परतला. जवळपास दोन वर्षांपूर्वी अभिनेत्याचे वडील सुब्रमणी यांचेही निधन झाले. आता आईचे छत्र हरपल्यामुळे अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मोहिनी यांचे चेन्नई येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून अजित कुमार दुबईमध्ये असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोहिनी यांच्यावर चेन्नईत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे बोले जात आहे.

अजित कुमार यांचे करिअर

अजित कुमार यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. अजित कुमार २०२५ मधील 'Vidaamuyarchi' आणि 'Good Bad Ugly' या चित्रपटांमध्ये अखेरचे दिसले.

Famous Actor Mother Death
Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! प्रवीण तरडेंचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'देऊळ बंद -2'ने कमावले तब्बल 'इतके' कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com