Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Television Actor Passes Away : टिव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. अभिनेत्याविषयी जाणून घेऊयात.
Famous Television Actor Passes Away
Famous Actor Deathsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

वयाच्या ५२ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वावर शोककळा

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले. '30 Rock' ड्रामामुळे गाजलेल्या सिटकॉममधील कामासाठी विशेष ओळखले जाणारे अभिनेते ग्रिझ चॅपमन (Grizz Chapman) यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याने वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते अमेरिकन टिव्हीचे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडायचा.

TMZ च्या वृत्तानुसार, अभिनेते ग्रिझ चॅपमन (Famous Television Actor Grizz Chapman Passes Away ) यांचे शुक्रवारी म्हणजेच २२ मे ला निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्याच्या मृत्यूचे अधिकृत वैद्यकीय कारण अद्याप जाहीर करण्यात आले नाही. परंतू ते दीर्घकाळापासून गंभीर मूत्रपिंडाच्या विकाराशी लढा देत होते आणि अनेक वर्षांपासून त्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू होते, अशी माहिती अनेक माध्यमांच्या अहवालातून समोर आली आहे.

अभिनेते ग्रिझ चॅपमन यांची कारकीर्द

ग्रिझ चॅपमन यांनी 'Grizz Chroniclez' नावाची एक यूट्यूबवर व्हिडीओची सीरिज देखील तयार केली होती. ज्यात त्यांनी विनोदी शॉर्ट नाटकांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्याने 'Blue Bloods', 'The Good Fight' आणि 'The Black List' यांसारख्या चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले आहे. अभिनेत्याच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे.

Famous Television Actor Passes Away
Cannes Model Attack: 'कान्स'मध्ये मॉडेलवर हल्ला; रक्तबंबाळ चेहरा अन् शरीरावर जखमा, VIDEO पाहून उडेल थरकाप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com