Deool Band 2 Collection : पैसाच पैसा! प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' थिएटरमध्ये घालतोय धुमाकूळ; १०० कोटींपासून काही पावले दूर, कमाई किती?

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 17 : प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने दोन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. तिसऱ्या वीकेंडला किती कमावले, जाणून घेऊयात.
Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 17
Deool Band 2 Collectionsaam tv
Published On
Summary

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज

जगभरात चित्रपटाची कमाई ६० कोटींपार

स्वामी भक्ती आणि शेतकऱ्यांचे जीवन चित्रपटातून पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांचे जीवन आणि स्वामी भक्ती यांचा सुरेख संगम आपल्याला 'देऊळ बंद 2' चित्रपटात पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला जगभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील गाणी, कथा, कलाकारांचा अभिनय आणि डायलॉग यामुळे सिनेमा खूपच गाजतोय. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री स्नेहल तरडे महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत झळकली आहे. चित्रपटाने शनिवारी किती कमावले, जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १७

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १७ व्या दिवशी 'देऊळ बंद २' ने १,११७ शोमधून २.६० कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ६६.५६ कोटी रुपये आणि नेट कमाई ५६.६० कोटी रुपये इतकी झाली आहे. वीकेंडला प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. आता चित्रपट रविवारी किती कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आता चित्रपटाचा तिसरा आठवडा सुरू आहे. चित्रपटाने दोन आठवड्यात जगभरात ६०.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये

  • दिवस १२ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १३ - २.३५ कोटी रुपये

  • दिवस १४ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १५ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १६ -१.४० कोटी रुपये

  • दिवस १७ - २.६० कोटी रुपये

  • एकूण - ५६.६० कोटी रुपये

'मुळशी पॅटर्न २' येणार

'देऊळ बंद २' च्या धामधूमीत प्रवीण तरडेंनी आता 'मुळशी पॅटर्न २' ची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्यायाम करतानाचा जीम मधील फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "चला व्यायाम पुन्हा सुरू... मुळशी पॅटर्न - २ , तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट... " आता लवकरच प्रवीण तरडे आपल्या प्रेक्षकांसाठी 'मुळशी पॅटर्न २' चित्रपट घेऊन येणार आहे. 2018 ला 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 17
Gautami Patil-Bhau Kadam : भाऊ कदम अन् गौतमी पाटीलची जोडी सुपरहिट, दादा कोंडकेंच्या गाण्यावरील झक्कास डान्स पाहून लेकीची खास कमेंट | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com