Bajrangi Bhaijaan 2
Bajrangi Bhaijaan 2Saam Tv

Bajrangi Bhaijaan 2: 'सिकंदर'नंतर सलमान खान पुन्हा दिसणार बजरंगीच्या भूमिकेत; लवकरच येणार 'बजरंगी भाईजान 2'

Bajrangi Bhaijaan 2: सिकंदर चित्रपटामुळे चर्चेत असलेला ​बॉलिवूड अभिनेता सलमान खान लवकरच 'बजरंगी भाईजान 2' या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.
Published on

Bajrangi Bhaijaan 2: सिकंदर चित्रपटामुळे चर्चेत असलेला ​बॉलिवूड अभिनेता सलमान खानने अलीकडेच प्रसिद्ध लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची भेट घेतली आहे. त्यांच्या चर्चेमुळे 'बजरंगी भाईजान 2' या चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत असून सोशल मीडियावर सलमान खानच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

2015 साली प्रदर्शित झालेला 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला होता. या चित्रपटात सलमान खानच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते आणि त्याला 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट' हा पुरस्कार मिळाला होता.​

Bajrangi Bhaijaan 2
Dhanashree Verma: युजवेंद्र चहलसोबत डिव्होर्सनंतर धनश्री वर्माचे नशीब चमकले; मिळाली सर्वात मोठ्या दोन टिव्ही शोची ऑफर!

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खान आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली. या भेटीत त्यांनी 'बजरंगी भाईजान 2' च्या संकल्पनेवर चर्चा केली असल्याचे बोलले जाते.या प्रकल्पात दिग्दर्शक कबीर खान देखील सहभागी होऊ शकतात, त्यामुळे सलमान, विजयेंद्र प्रसाद आणि कबीर खान यांची तिकडी पुन्हा एकत्र येऊ शकते. तथापि, सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.​

Bajrangi Bhaijaan 2
Neena Gupta: 'केवळ पुरुषांना आनंद देण्यासाठी...'; नीना गुप्ता शारिरीक संबंधांवर स्पष्टच म्हणाल्या

व्ही. विजयेंद्र प्रसाद हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित पटकथा लेखक मानले जातात. त्यांनी 'बॉब्बिली सिम्हम' (1994), 'मगधीरा' (2009), 'ईगा' (2012), 'बाहुबली' १ आणि २ (2015-2017), 'बजरंगी भाईजान' (2015) आणि 'आरआरआर' (2022) यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांच्या निर्मितीत योगदान दिले आहे.​ 'बजरंगी भाईजान' च्या पहिल्या भागाने आपल्या भावनिक कथानकामुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या सीक्वेलमध्ये कोणती कथा उलगडेल आणि ती प्रेक्षकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com