Dhanashree Verma: युजवेंद्र चहलसोबत डिव्होर्सनंतर धनश्री वर्माचे नशीब चमकले; मिळाली सर्वात मोठ्या दोन टिव्ही शोची ऑफर!

Dhanashree Verma: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटनंतर धनश्री वर्माला दोन सर्वात मोठ्या टिव्ही शोची ऑफर आली आहे.
Dhanashree Verma
Dhanashree VermaSaam Tv
Published On

Dhanashree Verma: ​भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. या घटनेनंतर धनश्री वर्माला 'खतरों के खिलाड़ी 15' या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. निर्माते आणि धनश्री यांच्यात या बाबतीत चर्चा सुरू असल्याचे समजते. तसेच, धनश्रीला बिग बॉस ओटीटी ४ या शोसाठी देखील ​

'खतरों के खिलाड़ी 15' मध्ये सहभागी होण्यासाठी धनश्री व्यतिरिक्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्वा मखीजाचे नावही चर्चेत आहे. अपूर्वा यांना 'इंडियाज गॉट टॅलेंट' शोमध्ये एका स्पर्धकावर केलेल्या अभद्र टिप्पणीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मेकर्स तीच्याशी देखील संपर्क साधत आहेत. तथापि, अद्याप या दोघींकडून किंवा शोच्या निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. ​

Dhanashree Verma
Ravikumar Menon Death: मनोज कुमार यांच्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानेही घेतला अखेरचा श्वास; कर्करोगाशी झुंज संपली

धनश्री वर्मा यापूर्वी 'झलक दिखला जा 11' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या शोसाठी तिला सपोर्ट करण्यासाठी एक्स नवरा युजवेंद्र चहल आला होता . आता 'खतरों के खिलाड़ी 15' मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यास, धनश्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आपली छाप सोडू शकते. ​

Dhanashree Verma
Vaishnavi Munde: धनंजय मुंडेंची लेक वैष्णवी मुंडे काय करते?

दरम्यान, 'बिग बॉस ओटीटी 4' या शोसाठीही धनश्रीला विचारण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता धनश्री 'खतरों के खिलाड़ी 15' आणि 'बिग बॉस ओटीटी 4' या दोन्ही शोपैकी कोणत्या शो मध्ये सहभागी होते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com