
Ravikumar Menon Death: आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप वाईट आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाची बातमी सकाळी कळताच सर्वत्र शोककळा पसरली. आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे. प्रसिद्ध तमिळ आणि मल्याळम चित्रपट अभिनेते रविकुमार मेनन यांचे वयाच्या ७० वर्षाी निधन झाले.
फुफ्फुसाच्या कर्करोगाशी दीर्घकाळ झुंज देत असलेले तमिळ आणि मल्याळम चित्रपट अभिनेते रविकुमार मेनन यांचे आज म्हणजेच शुक्रवारी सकाळी निधन झाले. अभिनेते रविकुमार यांच्या मुलाने या दुःखद बातमीला दुजोरा दिला.
कर्करोगाशी झुंज
सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, दक्षिण भारतीय कलाकार संघटना, नादिगर संगमने म्हटले आहे की, 'मल्याळम आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रविकुमार यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता चेन्नईतील वेलाचेरी येथील प्रशांत रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
'अवर्गल'मधून पदार्पण केले
तिरुअनंतपुरममध्ये जन्मलेल्या रविकुमार यांनी तमिळ आणि मल्याळम चित्रपट उद्योगाव्यतिरिक्त आयुष्याच्या अखेरीस अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्येही काम केले. त्यांनी १९७७ मध्ये 'के' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्णाण केली. बालचंदर दिग्दर्शित 'अवर्गल' या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. या चित्रपटात रजनीकांत, कमल हासन आणि सुजाता सारखे मोठे कलाकार होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.