
RJ MahvashS And Yuzvendra Chahal: क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्यांची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या १४ दिवसांनंतर, चहल यांचे नाव आरजे महविशसोबत जोडले जात आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर, आरजे महविशने स्वतः पुढे येऊन या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे.
महविशने एका व्हिडिओद्वारे सांगितले की, "मी १९ व्या वर्षी साखरपुडा केला होता, पण २१ व्या वर्षी तो मोडला." अलीगढसारख्या छोट्या शहरात वाढलेल्या महविशने नमूद केले की, तेथील मुलींचे मुख्य उद्दिष्ट चांगला नवरा शोधून लग्न करणे असतो. मात्र, तिला लग्नाच्या संकल्पनेची पूर्णपणे समज नाही,पण, कोणी लग्न करण्यासाठी डेट करणार असेल तर तोच माझा नवरा होईल. मी केवळ लग्नाच्या उद्देशानेच कोणालाही डेट करेल. या स्पष्टीकरणानंतर, महविशने चहलसोबतच्या डेटिंगच्या अफवा फेटाळल्या आहेत. तिच्या मते, अशा अफवा निराधार असून, लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.
महविशच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूज २४ च्या अहवालानुसार तिची अंदाजे संपत्ती सुमारे ३५ लाख रुपये आहे. रेडिओ जॉकी म्हणून ती दरमहा ७०,००० ते ८०,००० रुपये कमावते. तथापि, या माहितीस अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न अधिकृतपणे संपले आहे (युजवेंद्र चहल- धनश्री वर्मा घटस्फोटित). अंतिम तडजोडीसाठी दोघेही वांद्रे कुटुंब न्यायालयात हजर झाले. गुरुवार, २० मार्च २०२५ रोजी माध्यमांशी बोलताना, युजवेंद्र चहलचे वकील नितीन कुमार गुप्ता यांनी पुष्टी केली की न्यायालयाने घटस्फोटाचा आदेश मंजूर केला आहे, ज्यामुळे लेग-स्पिनर धनश्री वर्मा आणि त्याचे लग्न अधिकृतपणे संपुष्टात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.