Shruti Kadam
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यात प्रकृती बिघडल्याचे कारण देऊन अनुपस्थित राहिले होते.
मात्र धनंजय मुंडे एक दिवस आधी मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे धनंजय मुंडेंची मुलगी वैष्णवीही फॅशन शोमध्ये सहभागी झाली होती.
आता जिच्या फॅशन शोसाठी धनंजय मुडेंनी अजित पवारांच्या दौऱ्याला दांडी मारली ती वैष्णवी मुंडे नक्की कोण आणि करते काय हा प्रश्न विचारण्यात येत आहे.
वैष्णवी मुंडे सध्या विव्झ फॅशन स्कूलमध्ये मार्केटिंग आणि ब्रँडिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहे.
वैष्णवी मुंडेने 2024 मध्ये सवाना कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन येथून फॅशन डिझाईनमध्ये शिक्षण पूर्ण केले.
वैष्णवीने विव्हिएन वेस्टवुडचा पहिला भारतीय फॅशन शो आयोजित केला होता.
वैष्णवीच्या शोमध्ये भारतीय खादी आणि चंदेरी सिल्क यांसारख्या पारंपरिक कापडांना जागतिक व्यासपीठ मिळाले आहे.