ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अशा सहकाऱ्यांकडून तुमची स्तुती होते पण, त्यामध्ये लपलेला उपहास किंवा टीका असू शकते. उदाहरणार्थ, "तुमचं प्रेझेंटेशन अपेक्षेपेक्षा चांगलं होतं
तुमच्या मेहनतीने केलेल्या कामाचे श्रेय हे सहकारी स्वतःकडे घेतात, त्यामुळे तुमच्या योगदानाची योग्य दखल घेतली जात नाही.
तुमच्या मागे तुमच्याबद्दल नकारात्मक चर्चा करतात, त्यामुळे इतर सहकाऱ्यांमध्ये तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.
अशा सहकाऱ्यांचा पाठिंबा तेव्हाच मिळतो जेव्हा त्यांना त्यातून काही फायदा होतो; अन्यथा ते तुमची मदत करण्यास टाळाटाळ करतात.
तुमच्या कामात अडथळे येतात किंवा तुमच्यावर मानसिक तणाव वाढेल अशी स्पर्धा ते तुमच्याशी करतात.
तुमच्या प्रोजेक्ट्समध्ये लहान लहान चुका घडवून आणणे किंवा आवश्यक माहिती लपवणे यांसारख्या कृतींमधून ते तुमच्या कामात बाधा निर्माण करतात.
तुमच्या कामाच्या प्रगतीमुळे ते कधी खूश नसतात काही तरी बोलून तुम्हाला अपयशी करण्याचा प्रयत्न करत असतात.
लहानशा चुकांनाही ते मोठे करून इतरांसमोर मांडतात, त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.
तुमच्या दुर्बल बाजूंचा वापर करून ते स्वतःच्या फायद्यासाठी परिस्थिती निर्माण करतात.