सलमान पक्षपात करतो, Bigg Bossसाठी 200 कोटी घेतो? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

Salman Khan-Bigg Boss 19 : सलमान खान बिग बॉस शोसाठी किती कोटी मानधन घेतो जाणून घेऊयात. शोच्या निर्मात्यांनी या संबंधित मोठी अपडेट दिली आहे.
Salman Khan-Bigg Boss 19
Bigg BossSAAM TV
Published On
Summary

'बिग बॉस 19' सध्या चांगले गाजत आहे.

'बिग बॉस 19'चे होस्टिंग सलमान खान करतो.

सलमान खान 'वीकेंड का वार'साठी कोट्यावधींचे मानधन घेतो.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या 'बिग बॉस 19'चे होस्टिंग करत आहेत. त्यामुळे शनिवार-रविवारी 'वीकेंड का वार' सलमान खान पाहायला मिळतो. 'बिग बॉस 19' सुरू झाल्यापासून सलमान खानच्या माधनाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र आता यावर 'बिग बॉस'च्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे.

'बिग बॉस'चे निर्माते ऋषि नेगी आहेत. India Today शी बोलताना त्यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. सलमान खानला 'बिग बॉस'च्या प्रत्येक सीझनसाठी 150-200 कोटी रुपये घेत असल्याचे चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते. यावर मुलाखतीत ऋषि नेगी यांना सलमान खानच्या मानधनाविषयी विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, "सलमान खानचे मानधन किती मला माहिती नाही. कारण मानधनाबाबत सलमान खान आणि जिओ हॉटस्टार यांच्यात करार झालेला आहे. सलमान त्या पैशांचा हकदार आहे. "

सध्या बिग बॉसच्या घरातून असे काही सदस्य बाहेर गेले आहेत. ज्यामुळे सलमान खानच्या होस्टिंगवर प्रश्न निर्माण होत आहे. तो सदस्यांमध्ये पक्षपातीपणा करतो असे बोले जात आहे. त्यावर ऋषि नेगी म्हणाले, "पक्षपातीपणाचे सलमान खानवर केलेले आरोप काही नवीन नाही. पण जे सलमानला ओळखतात त्यांना माहित असेल की, सलमान खान आपल्या मनाविरुद्ध काही करत नाही..."

सलमान खानच्या बिग बॉस पाहण्यावर ऋषि नेगी म्हणाले, 'बिग बॉस 19'च्या घरात काय घडते याची पूर्ण कल्पना कल्पना सलमानला असते. त्याला शक्य असते तेव्हा तो स्वतःच एपिसोड पाहतो. कधी वेळ मिळाला नाही. तर एका आठवड्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे एक-दोन तासांचे फुटेज आम्ही एकत्र पाहतो. त्याचे मित्र त्याला प्रतिक्रिया देतात. त्याची मते, निर्मात्यांचे मत आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन तो 'वीकेंड का वार' करतो.

Salman Khan-Bigg Boss 19
Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती बिघडली; उपचारासाठी पैसा नाही, रणबीरच्या बहिणीकडून मदतीचा हात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com