Palmistry Astrology Signs: तुमच्या हातावर कमळ आहे? पैशांचा पाऊस पडणार, वाचा हस्तरेखा शास्त्र काय सांगतेय
हस्तरेखेत त्रिकोण, कमळ आणि माशाचे चिन्ह अत्यंत शुभ मानले जातात.
ही 3 चिन्हे धन, भाग्य आणि अचानक लाभाचे संकेत देतात.
कमळ चिन्ह विष्णुयोग आणि लक्ष्मी कृपेशी संबंधित आहे.
हस्तरेखा शास्त्रानुसार आपल्या हातातील रेषा आणि चिन्हांमध्ये व्यक्तीचं भविष्य दडलेलं असते. हातावरच्या प्रत्येक रेषा आयुष्यातल्या घटना, यश, अपयश आणि नशिबाचे संकेत देतात. विशेषतः काही चिन्हे अशी असतात जी व्यक्तीला धन, समृद्धी आणि अचानक लाभाचे योग देतात. यामध्ये त्रिकोण, कमळ आणि माशाचे चिन्ह अतिशय शुभ मानले जाते. पुढे आपण या ३ चिन्हांबद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
त्रिकोणी आकाराचे चिन्ह
हस्तरेखेमध्ये त्रिकोण हे अत्यंत शुभ चिन्ह मानले जाते. याला धनवान असल्याचे चिन्ह सुद्धा सांगितले जाते. भाग्यरेषा, आरोग्यरेषा आणि मेंदूरेषा एकत्र येऊन जर हातात पूर्ण त्रिकोण तयार करतात, तर त्याला "धनकोठरी" म्हणतात. असे चिन्ह असलेले लोक संपूर्ण आयुष्यात सतत पैसा कमावतात. व्यापार, नोकरी किंवा गुंतवणुकीत त्यांना यश मिळतं. मात्र त्रिकोणाच्या आत क्रॉस चिन्ह असेल, तर धनहानीचा होण्याचा ईशारा असू शकतो. त्यामुळे असे चिन्ह असणाऱ्यांनी दानधर्म आणि चांगले कर्म करत राहीले पाहिजे.
कमळाचे चिन्ह
ज्या व्यक्तींच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असते त्यांच्यावर विष्णुयोगाचा आशीर्वाद असतो. दुसऱ्याच्या आयुष्यात हे लोक खूप लकी मानले जाते. हे चिन्ह विष्णुयोग दर्शवतात. कारण कमळ हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे. या चिन्हामुळे व्यक्तीवर लक्ष्मी आणि विष्णूची कृपा राहते. अशा व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण, बुद्धिमत्ता आणि वक्तृत्व असते. हे लोक समाजात आदर प्राप्त करतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात आणि त्यांचा व्यवसाय प्रगतीच्या मार्गावर जातो.
माशाचे चिन्ह
ज्या व्यक्तींच्या हाताच्या मनगटाजवळ जीवनरेषेवर माशाचे चिन्ह असते ते अत्यंत शुभ मानले जाते. हे चिन्ह अचानक धनलाभ, लॉटरी किंवा परदेशातून मिळणाऱ्या आर्थिक फायद्याचा लाभ घेणारे असतात. अशा लोकांना घरच्या संपत्तीचा लाभ मिळतो. समाजात मान-सन्मान वाढतो आणि ते विदेश प्रवासातून यश मिळवतात.
टीप: ही माहिती विविध धार्मिक ग्रंथ, ज्योतिषीय स्रोत आणि तज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणतीही निश्चित माहिती किंवा सल्ला घेण्यासाठी धर्मतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

