Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती बिघडली; उपचारासाठी पैसा नाही, रणबीरच्या बहिणीकडून मदतीचा हात

Sudhir Dalvi Hospitalized : 'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेते सुधीर दळवी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या उपचारासाठी रणबीर कपूरच्या बहीणने मदत केली. मात्र रिद्धिमा कपूर आता ट्रोल होत आहे.
Sudhir Dalvi Hospitalized
Shirdi Ke Sai BabaSAAM TV
Published On
Summary

'शिर्डी के साई बाबा' फेम अभिनेते सुधीर दळवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रणबीर कपूरच्या बहीणने उपचारासाठी सुधीर दळवी यांना मदत केली.

रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर ट्रोल होत आहे.

'शिर्डी के साई बाबा' या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती बिघडली आहे. सुधीर दळवी 86 वर्षांचे आहेत. ते 8 ऑक्टोबरपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात एडमिट आहेत. सुधीर दळवी यांनी सेप्सिससारखं जीवघेणं इन्फेक्शन (Sepsis Infection) झाले आहे. त्याच्या उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली.

सुधीर दळवी यांच्या मदतीसाठी बॉलिवूडमधून एक हात पुढे आला. तो म्हणजे रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor Sahni) होय. मीडिया रिपोर्टनुसार, रिद्धिमा कपूरने सुधीर दळवींच्या मेडिकल फंडमध्ये देणगी दिली आहे. मात्र तिला यामुळे ट्रोलिंगला समोर जावे लागले. रिद्धिमा कपूरने एका सोशल मिडिया पोस्टवर कमेंट करून आपण मदत केल्याची माहिती दिली. तिने लिहिलं क, "डन! लवकर बरे व्हा हीच प्रार्थना..."

रिद्धिमाच्या या कमेंटवर एका युजरने कमेंट केली की, तू मदत केल्याचे येथे का सांगितले...फूटेज पाहिजे? यावर रिद्धिमाने देखील सडेतोड उत्तर दिले आहे. तिने लिहिलं की, "जीवनात प्रत्येक गोष्ट फक्त दिखाव्यासाठी करायची नसते. एखाद्या गरजू व्यक्तीला, आपल्या क्षमतेनुसार मदत करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे."

Sudhir Dalvi Hospitalized
Pinga Ga Pori Pinga Video : कुणीतरी येणार येणार गं! प्रेरणा होणार आई, 'पिंगा गर्ल्स'चा आनंद गगनात मावेना

मीडिया रिपोर्टनुसार, सुधीर दळवी यांच्या रुग्णालयाचे बिल 10 लाख रुपयांच्या पुढे गेले असून उपचाराचा एकूण खर्च 15 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सुधीर दळवी यांना 'शिरडी के साई बाबा' चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी 'जुनून', 'चांदनी' , 'एक्सक्यूज मी' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sudhir Dalvi Hospitalized
Priyanka Chopra Video : प्रियंका चोप्राने गळ्यात गुंडाळला साप, पती निक जोनस पाहतच राहिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com