Arbaj Shaikh : "....आणि मी रॉकेल प्यायलो" सैराट फेम अभिनेत्याने सांगितला धक्कादायक किस्सा

Sairat Fame Salya Arbaj Shaikh : 'सैराट' चित्रपटातील सल्या अर्थात अरबाज शेखने एका मुलाखतीत लहानपणी चुकून रॉकेल प्यायल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला. त्याच्या या खुलाशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
SAIRAT ACTOR ARBAZ SHAIKH REVEALS SHOCKING CHILDHOOD KEROSENE INCIDENT
SAIRAT ACTOR ARBAZ SHAIKH REVEALS SHOCKING CHILDHOOD KEROSENE INCIDENTSaam Tv
Published On
Summary
  • 'सैराट' फेम अरबाज शेखने लहानपणी चुकून रॉकेल प्यायल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला

  • राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या खोडकर बालपणाच्या अनेक आठवणी शेअर केल्या

  • त्याच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नागराज मंजुळेचा 'सैराट' या चित्रपटाने महाराष्ट्राला वेड लावलं. परश्या आणि आर्ची यासारख्या पात्रांसारखं इतर पात्रांनाही अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. याच चित्रपटातील सल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख आजही या भूमिकेमुळे ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी वडिलांच्या उपचारादरम्यान रुग्णालयाकडून औषधांच्या नावाखाली आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याने रॉकेल प्यायल्याचं म्हटलं आहे.

अरबाज शेखने नुकतीच राजश्री मराठीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या लहानपणीच्या खोडकर स्वभावाबद्दल आणि त्या काळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्याने असा एक प्रसंग सांगितला, ज्याबद्दल आतापर्यंत फार कमी लोकांना माहिती होती. बालपणातील आठवणी सांगताना अरबाज म्हणाला, "मी लहानपणी खूप अगाऊ होतो. दिवसभर खेळणं, सायकल चालवणं, मित्रांसोबत भांडणं आणि खूप मार खाणं हे सगळं माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग होतं. माझ्या खोड्यांमुळे घरच्यांना मला सतत सांभाळावं लागायचं."

SAIRAT ACTOR ARBAZ SHAIKH REVEALS SHOCKING CHILDHOOD KEROSENE INCIDENT
Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

याच गप्पांमध्ये त्याने एक धक्कादायक अनुभव सांगितला. "स्टोव्हमध्ये वापरतात ते रॉकेल मी लहानपणी चुकून प्यायलो होतो," असा खुलासा त्याने केला. त्याच्या या वक्तव्याने अनेक चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. मात्र, हा प्रसंग त्याच्या लहानपणी घडला असल्याचे स्पष्ट केले.

SAIRAT ACTOR ARBAZ SHAIKH REVEALS SHOCKING CHILDHOOD KEROSENE INCIDENT
Kitchen Hacks : करपलेल्या भांड्यांवरचा काळपटपणा चुटकीसरशी होईल गायब, 'या' सोप्या टिप्स करून पहा

अरबाजच्या कबुलीची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. आपल्या आयुष्यातील चांगले-वाईट अनुभव कोणताही आडपडदा न ठेवता तो चाहत्यांसमोर मांडत असल्यामुळे अनेकांनी त्याच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे. सैराटनंतर अरबाज शेख अभिनयासोबतच तो सोशल मीडियावरही सक्रिय असून वैयक्तिक आयुष्यातील अनुभव चाहत्यांशी शेअर करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com