Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाडच्या लग्नावर सायलीची पहिली प्रतिक्रिया; मनातल्या भावना पोस्टमधून केल्या शेअर

अभिनेत्री सायली संजीवची एक पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरली आहे.
Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad
Sayali Sanjeev On Ruturaj GaikwadSaam TV

Sayali Sanjeev News: गेल्या काही दिवसांपासून मारठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर काल त्याने आपल्या प्रेयसीसह लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायत. अशात अभिनेत्री सायली संजीवची एक पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरली आहे. (Ruturaj Gaikwad Wedding)

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री सायली संजीवचं नाव क्रिकेटर ऋतुराजच्या नावाशी जोडलं जात होतं. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अनेकवेळा त्यांना एकत्र स्पॉट केल्याच्या अफवा देखील पसरल्या होत्या. मात्र या अफवांविषयी दोघांपैकी कोणीही पुढे येऊन प्रतिक्रिया देणे टाळले.

Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad
Delhi Crime News: दिल्लीत चाललंय काय? एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला, नंतर तरुणाने स्वत:लाच संपवलं

अशात आता ऋतुराजने आपल्या प्रेयसीसह लग्नगाठ बांधली असल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. त्याने पत्नीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. त्यांचे फोटो पाहून सोशल मीडियावर दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Sayali Sanjeev Post
Sayali Sanjeev PostInstagram

मनोरंजन विश्वातील कलाकारांनी देखील दोघांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्यात. सायली संजीवनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ऋतुराजच्या लग्नाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. तिने त्याला आणि त्याच्या पत्नीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुराज आणि त्याच्या पत्नीचा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने त्यांना शुभेच्छा दिल्यात. सायलीने देखील ऋतुराजसोबत तिच्या लग्नाच्या सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.

Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad
Salman Khan and Kareena Kapoor: करिनाने बाथरुममध्ये लावले होते सलमानचे फोटो, पण एक दिवशी अचानक फाडून टाकले, कारण..

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com