
Kareena Kapoor Used To Salman Khan Poster In Bathroom: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिना कपूर नेहमीच प्रेक्षकांमध्ये काह चित्रपटांमुळे ते चर्चेत राहिले आहेत. त्यांनी ‘बजरंगी भाईजान’, ‘क्यों की’, ‘मैं और मिसेस खन्ना’ आणि ‘मैने प्यार किया’ या चित्रपटांत प्रमुख भूमिका साकरली होती. यातीलच एक चित्रपट म्हणजे, ‘मैने प्यार किया’. या चित्रपटामुळे सलमान आणि करिना बरेच चर्चेत होते. त्या चित्रपटामुळेच या दोघांनाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. एका रिॲलिटी शोमध्ये सलमान खानने एक किस्सा शेअर केला आहे, तो ऐकून सर्वच थक्क झाले.
सलमान खान ‘मैने प्यार किया’ या चित्रपटापासून चाहत्यांमध्ये खूपच फेमस झाला होता. तरूणींचा लाडका चॉकलेट बॉय म्हणून फेमस झालेल्या सलमानच्या फॅन्स लिस्टमध्ये करिना देखील होती. जरी या दोघांनी एकाच चित्रपटात काम केले असले तरी, ‘मैने प्यार किया’ या चित्रपटापासून करिना देखील सलमानच्या मागे वेडी झाली होती. एकदा करीना कपूर खान आणि सलमान खान एका रिॲलिटी शोमध्ये एकत्र दिसले तेव्हा सलमान खानने हे गुपित उघड केले. ‘दस का दम’ या रिॲलिटी शोमध्ये सलमान खानच्या तोंडून हा किस्सा ऐकून सगळेच थक्क झाले.
सलमान खानने आपल्या करिअरमध्ये करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघींसोबत काम केले. करिश्मासोबत सलमान ‘जुडवा’, ‘अंदाज अपना अपना’ आणि ‘जीत’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तेव्हा करीना शाळेत शिकत होती. सलमानने करिनाशी संबंधित एक किस्सा सांगितला. करिनाने तिच्या बाथरूममध्ये सलमान खानचे पोस्टर लावले होते. सलमानने ते सर्व पाहून पोस्टर्स फाडले आणि राहुल रॉयचे पोस्टर्स लावले होते. याचा खुलासा खुद्द सलमानने केला. सलमानने जे सांगितले ते ऐकून सगळ्यांचेच हसू आवरत नव्हते. (Entertainment News)
‘दस का दम’ या रिॲलिटी शोमध्ये सलमानने हा किस्सा शेअर केला होता, तो म्हणतो, “मी आणि करिश्मा त्यावेळी ‘निश्चय’च्या शूटिंगमध्ये व्यग्र होतो. त्यावेळी करिश्मा मला म्हणते, बेबोने तुझे फोटो तिच्या बाथरूममध्ये लावले आहेत. पण नंतर ‘आशिकी’ प्रदर्शित झाल्यानंतर बेबोने माझे पोस्टर फाडून राहुल रॉयचे पोस्टर लावले. एकदा मला करिना भेटली तेव्हा ती मला म्हणते, माझ्या बाथरूममध्ये आता फोटो सलमान तुझे नाही तर, राहुल रॉयचे आहेत.”
त्यावेळी ‘दस का दम’या रिॲलिटी शोमध्ये सलमानसोबत करिना आणि करिश्मा या दोघीही एकत्र होत्या. तो किस्सा ऐकून सेलिब्रिटींसह सर्वच प्रेक्षक पोटधरून हसत होते. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘टायगर ३’, ‘टायगर Vs पठान’ या चित्रपटात सलमान दिसणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.