Urfi Javed Fashion: आता एवढंच बाकी होतं!, नव्या अवतारात दिसली उर्फी...

Urfi Javed Latest Outfit: उर्फी जावेद नेहमीच आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असलेलं नाव. उर्फी जावेद सोशल मीडिया वेगवेगळ्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
Urfi Javed Fashion
Urfi Javed FashionSaam Tv

Urfi Javed Dress: उर्फी जावेद नेहमीच आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असलेलं नाव. उर्फी जावेद सोशल मीडिया वेगवेगळ्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच पुन्हा एकदा उर्फी तिच्या नव्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करणाऱ्या उर्फीने आता थेट केसांचाच ड्रेस बनावलाय.

Urfi Javed Fashion
Alia Bhatt's grandfather Passed Away: आलियावर कोसळला दु:खाचा डोंगर, झाले जवळच्या व्यक्तीचे निधन..

उर्फीची फॅशन फक्त भारतातच नाही तर, जगभरात प्रसिद्ध आहे. उर्फी ही तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीत चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या वेगळ्या ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. असाच एक नवीन अवतार घेऊन उर्फी पापराझींसमोर आली होती. बुधवारी संध्याकाळी ती पापराझींसमोर नव्या लूकमध्ये स्पॉट झाली होती. यामुळे पुन्हा एकदा ती आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहिली आहे.

केसांपासून तयार केला नवीन टॉप

उर्फी ही नेहमीच सोशल मिडियावर वेगवेगळ्या कारणांनी सक्रिय असते. तिच्या फॅशनची चर्चा ही सर्वदूर आहे. अशातच ती तिच्या नवीन लुकमुळे पुन्हा चर्चेत आली. तिने चक्क केसांपासून बनवलेला टॉप घातला आहे. तिच्या ह्या अश्या वेगवेगळ्या लुकमुळे ती नेहमीच प्रसिद्ध होताना दिसते. सेलिब्रटी फोटोग्राफर विरलभयानी या इन्स्टाग्राम अकांऊटवरुन तिचा ह्या लुकमधील फोटो व्हायरल झाला आहे. तिने या टॉपवर गुडघ्यापर्यंत लांब खोटे केस लावले आहे.

Urfi Javed Fashion
'Yeh Jawaani Hai Deewani' Completes 10 Years: रणबीर कपूरसोबतचा तो इमोशनल VIDEO दीपिकाने केला शेअर, म्हणाली - ‘माझा आत्मा...’

सोशल मिडियावर ट्रोल

उर्फी ही नेहमीच तिच्या नवनवीन लुकमुळे चर्चेत येत असते. यामुळे ती सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसते. नवनवीन फॅशनसोबतच तिला ट्रोलिंगला सामोर जाव लागत. तिच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट केली आहे की, "कुठेही कसही काहीही लावत असते." "फॅशनच्या नावावर काहीही करत असते", अस अजून एकाने लिहलं आहे."उर्फी जावेद पागल झाली आहे" तर "हिने हिच्या स्वत: च्या केसांचा टॉप बनवलाय की काय?"अशा कमेंट्स आल्या आहेत. उर्फी ने सोशल मिडियावर च्विंगमपासून बनवलेल्या टॉपवरचा फोटो शेअर केला होता. या टॉपला तिने बबलगम टॉप असे म्हटले आहे. 'द बबलगम टॉप,मेड फॉम च्विंगम' अस कॅप्शनही दिल होतं.

Urfi Javed Fashion
Arjun Kapoor Statement: मलायकाच्या प्रेग्नंसीची अफवा पसरली, अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेली; रागारागाने म्हणाला, काहीही...

उर्फी जावेदचं करिअर

उर्फी जावेदच्या करिअबद्दल सांगायच तर, ती २०१६ मध्ये 'बडे भैया की दुल्हनिया'या टिव्ही शोमधून पहिल्यांदा दिसली होती. त्यानंतर तिने बरेच टिव्ही शो केले आहेत. याशिवाय ती 'बिग बॉस ओटीटी' आणि 'स्प्लिट्सव्हिला' यांसारख्या शोमध्ये दिसली होती. उर्फी मागील काही वर्षात अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनर सोबत काम करताना दिसली होती तर आता ती अमित अग्रवाल या डिझायनरसोबत दिसली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com