Delhi Crime News: दिल्लीत चाललंय काय? एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला, नंतर तरुणाने स्वत:लाच संपवलं

Delhi Boy Stabbed Girl: दिल्लीतील बेगमपूर येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून (Delhi Police) सुरु आहे.
Delhi Crime News
Delhi Crime NewsSaam Tv

Delhi Police: दिल्लीत गुन्हेगारीच्या (Delhi Crime) घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच 16 वर्षांच्या साक्षीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी घटनेने दिल्ली हादरली आहे. दिल्लीमध्ये एकतर्फी प्रेमातून (one sided love) एकाने तरुणीची हत्या केली त्यानंतर या तरुणाने स्वत:चेच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील बेगमपूर येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून (Delhi Police) सुरु आहे.

Delhi Crime News
West Bengal News : संशयानं केला घात, बांगलादेशी समजून पश्चिम बंगालच्या दाम्पत्याला तब्बल ३०१ दिवस जेलमध्ये डांबलं

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतल्या बेगमपूर येथे एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला केला. यानंतर या तरुणाने गळफास लावून स्वत:ला संपवलं. तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे. एकतर्फी प्रेमात तरुणीने दिलेला नकार सहन न झाल्यामुळे या तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

Delhi Crime News
Coromandel Express Horrific Train Accident : डोळे उघडले तेव्हा १०-१५ प्रवासी अंगावर पडले होते...; अपघातग्रस्त ट्रेनमधील प्रवाशानं सांगितला थरारक प्रसंग

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपी तरुणाचे नाव अमित होते. अमित आणि तरुणी दोघेही रोहिणी सेक्टर 24 मध्ये असलेल्या एकाच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत होते. ही कंपनी अमितच्या मोठ्या बहिणीची असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणीच अमित आणि तरुणीची ओळख झाली होती. अमितला तरुणी खूप आवडत होती. त्याचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने अनेकदा तरुणीला प्रपोज केला पण तिने नकार दिला होता. तरुणीने दिलेला नकार अमितला पचवता आला नाही. त्यामुळे त्याने टोकाचा निर्णय घेत तरुणीवर हल्ला केला.

Delhi Crime News
Sangli Crime News: सांगली हादरली! अल्पवयीन मुलीचं भररस्त्यात अपहरण, अत्याचार करत धारदार शस्त्राने वार

अमितने शुक्रवारी रात्री तरुणीवर चाकून हल्ला केला. नकार दिल्याने संतप्त झालेल्या अमितने तरुणीचा चाकूने गळा चिरला. तो ऐवढ्यावर थांबला नाही तर त्याने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. तरुणीवर हल्ला केल्यानंतर त्याने स्वत: गळफास लावून घेतला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून ती बचावली आहे. पण अमितचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास दिल्लीच्या बेगमपूर पोलिसांकडून सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com