Riteish- Raja Shivaji : चित्रपट नव्हे भावना! रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' का पाहावा? वाचा ५ यशाची कारणे

Raja Shivaji Review : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला दोन दिवसात भरपूर चांगला प्रतिसाद मिळला आहे. प्रेक्षक रितेशच्या दिग्दर्शनाचे कौतुक करत आहे. 'राजा शिवाजी'च्या यशाची ५ मुख्य कारणे जाणून घेऊयात.
Raja Shivaji Review
Riteish- Raja ShivajiSAAM TV
Published On
Summary

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे रोज रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटात रितेश देशमुखने शिवरायांची भूमिका साकारली.

'राजा शिवाजी' चित्रपटाने २ दिवसांत १५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट महाराष्ट्र दिनाला (१ मे) ला थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात रितेश देशमुखने शिवरायांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हा चित्रपट मराठी, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यातून चित्रपटाचा रिव्ह्यू आणि मते देत आहेत.

'राजा शिवाजी' चित्रपट का पाहावा, याची ५ मुख्य कारणे जाणून घ्या

  • तगडी स्टारकास्ट

'राजा शिवाजी' चित्रपटात बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, विद्या बालन हे दिग्गज कलाकार झळकले. जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. महेश मांजरेकर शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत अभिनेत्री भाग्यश्री दिसणार आहेत. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल. संजय दत्तने अफझल खानची भूमिका साकारली.

  • अजय-अतुल यांचे संगीत

'राजा शिवाजी' चित्रपटाचे संगीत ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. अजय-अतुलच्या संगीतामुळे 'राजा शिवाजी' चित्रपटाला एक उंची मिळते. तसेच प्रत्येक प्रसंग जिवंत वाटतो. संगीतकार अजय-अतुल यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने चित्रपटातील भावनिक आणि ॲक्शन दृश्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

  • सलमान खानची एन्ट्री

'राजा शिवाजी' चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सलमानने 'जीवा महाला' यांची भूमिका साकारली आहे. त्याची अत्यंत प्रभावी भूमिका सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रेक्षक या भूमिकेचे वर्णन 'पराक्रमी रक्षक' अशी करत आहेत. "शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं!" हा सलमान भाईचा डायलॉग खूप गाजत आहे.

  • ॲक्शन अन् अभिनय

'राजा शिवाजी'मध्ये दाखवलेली ॲक्शन आणि युद्धाची दृश्ये खूप खरी वाटतात. हाताने, तलवारीने लढली जाणारी लढाई पाहून आपल्याला शिवरायांचा नक्कीच आठवतो. अत्यंत कुशलतेने कोरिओग्राफ केलेल्या युद्धाच्या दृश्यांचा समावेश आहे. प्रत्येक कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. कलाकारांच्या डोळ्यात आग दिसते. रितेश देशमुख आणि संजय दत्तच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे.

  • रितेश देशमुखचे दिग्दर्शन

रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' या चित्रपटावर तब्बल १० वर्ष काम केले आहे. त्याने दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता अशा दुहेरी भूमिका निभावल्या आहेत. रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची योग्य माहिती पोहचवली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. त्यातील किल्ले आणि रणांगणांची चित्तथरारक दृश्ये भन्नाट आहेत. 'राजा शिवाजी' एक चित्रपट नाही तर भावना आहे.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

मराठी भाषेत 'राजा शिवाजी' चित्रपटाने अवघ्या २ दिवसांत १५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. 'राजा शिवाजी'ची हिंदी आणि मराठी अशा दोन्ही आवृत्त्यांची कमाई एकत्रित केल्यानंतर दोन दिवसांनंतरची भारतातील नेट कमाई २१.९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एकूण ग्रॉस कमाई २६.०६ कोटी रुपये इतकी झाली आहे.Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी ७.१५ कोटी रुपयांची कमाई केली. मराठी भाषेतील चित्रपटाची एकूण कमाई आतापर्यंत १५.१५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर हिंदी भाषेत दुसऱ्या दिवशी ३.४० कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे दुसऱ्या दिवशीची एकूण कमाईचा आकडा १०.५५ कोटी रुपयांवर पोहोचला.

Raja Shivaji Review
Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com