Riteish-Raja Shivaji Collection : शिवरायांच्या शौर्याची देशभरात गर्जना! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची दुसऱ्या दिवशीही बंपर कमाई, नवा रेकॉर्ड केला

Raja Shivaji Box Office Collection Day 2 : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने दोन दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.
Raja Shivaji Box Office Collection Day 2
Riteish-Raja Shivaji Collectionsaam tv
Published On
Summary

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे रोज रिलीज झाला.

'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खान देखील झळकला आहे.

'राजा शिवाजी'मधून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी रितेश देशमुख आणि जिनिलिया 'राजा शिवाजी' चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहे. जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना ऐकू येत आहे. हा चित्रपट १ मे रोज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख आणि निर्मिती जिनिलियाने केली आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मराठी भाषेत 'राजा शिवाजी' चित्रपटाने अवघ्या २ दिवसांत १५ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी १९८० शोजमधून ७.१५ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी कमावलेल्या ८ कोटी रुपयांच्या तुलनेत ही कमाई कमी आहे. दुसऱ्या दिवशी ५७ टक्के इतका भक्कम प्रेक्षक प्रतिसाद मिळाल्यामुळे, मराठी भाषेतील चित्रपटाची एकूण कमाई आतापर्यंत १५.१५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाने हिंदी भाषेत पहिल्या दिवशी ३.३५ कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे चित्रपटाची पहिल्या दिवशी एकूण कमाई ११.३५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. आता दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ३.४० कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे दुसऱ्या दिवशीची एकूण कमाईचा आकडा १०.५५ कोटी रुपयांवर पोहोचला. येथे कमाईमध्ये ७ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येते.

'राजा शिवाजी'ची हिंदी आणि मराठी अशा दोन्ही आवृत्त्यांची कमाई एकत्रित केल्यानंतर दोन दिवसांनंतरची भारतातील नेट कमाई २१.९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एकूण ग्रॉस कमाई २६.०६ कोटी रुपये इतकी झाली आहे.

'राजा शिवाजी' तगडी स्टारकास्ट

'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, भाग्यश्री, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांच्यासह अनेक मोठे कलाकार झळकले आहेत.

Raja Shivaji Box Office Collection Day 2
Tara Sutaria : वीर पहाडियानंतर तारा सुतारियाच्या आयुष्यात 'आशिक', डेटिंगच्या चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com