

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे विलिनीकरणाचं पहिलं पाऊल
अतुल बेनके आणि अमोल कोल्हे यांचा एकत्रित वाटचालीचा निर्णय
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत घोषणा
अखेर अजितदादांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं पहिलं पाऊल पडलंय. आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभुमी जुन्नरमध्ये. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनकेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच आपण अमोल कोल्हेंसोबत एकत्रित वाटचाल करणार असल्याचं जाहीर केलंय. दुसरीकडे बेनकेंनी जुन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची घोषणा केल्यानंतर तटकरेंनी मात्र याबाबत स्थानिक राजकीय परिस्थितीचा हवाला दिलाय.
खरंतर अजित पवारांच्या नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील, शिरुरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र याच दरम्यान अजितदादांचा मृत्यू झाला. त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत 73 पैकी 51 जागा जिंकत मोठी मुसंडी मारली. जुन्नरमध्ये तर 8 जिल्हा परिषद गटापैकी 4 दादांच्या राष्ट्रवादीला, 1 ठाकरेंच्या सेनेला तर 3 जागांवर शिंदेसेनेला यश मिळालंय.
आता दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगलीय खरी.. मात्र त्यावरुन दावे प्रतिदावे सुरु असतानाच जुन्नरमध्ये विलिनीकरणाबाबत पहिलं पाऊल पडलंय.. मात्र जे जुन्नरमध्ये शक्य झालं ते महाराष्ट्रात होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.