Bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीवर कुत्र्याने केला हल्ला; थोडक्यात वाचला जीव, VIDEO व्हायरल

Raveena Tandon Dog Attack : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर भर कार्यक्रमात कुत्र्याने हल्ला केला. अभिनेत्री थोडक्यात वाचली. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
Raveena Tandon Dog Attack
Bollywood ActressSAAM TV
Published On
Summary

कुत्र्याने केला अभिनेत्रीवर हल्ला

कुत्रा भर कार्यक्रमात अभिनेत्रीवर धावून गेला

चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान हा प्रकार घडला

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर कुत्र्याने हल्ला केला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गुरुवारी रात्री मुंबईत 'ओह माय डॉग' (Ohh My Dog) या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंग पार पडले. स्क्रीनिंगदरम्यान, एका कुत्र्याने अचानक अभिनेत्री रवीना टंडन यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कपड्यांना पकडले. मात्र अभिनेत्रीने संयम दाखवत न घाबरता परिस्थिती शांतपणे हाताळली.

व्हिडीओत पाहू शकता की, रवीना टंडन'रेड कार्पेट'वर उपस्थित होती. तिथे असलेल्या एका कुत्र्‍याशी अभिनेत्री प्रेमाने संवाद साधताना दिसली. अभिनेत्री खाली बसल्या आणि तिने कुत्र्याला प्रेमाने कुरवाळले तसेच तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींसाठी त्याच्यासोबत फोटोही काढले.जेव्हा पापाराझींच्या विनंतीनुसार त्या एकट्याने फोटो काढण्यासाठी उभ्या राहिल्या, तेव्हा त्यांच्या पिवळ्या टॉपच्या लटकणारी दोरी आणि बाही पाहून त्या कुत्र्याचे लक्ष विचलित झाले. जोरात भुंकत त्याने अचानक त्यांच्या कपड्यांना पकडले.

ही अनपेक्षित घटना घडली असतानाही, अभिनेत्री घाबरली नाही. तिने शांतता राखली, कुत्र्याच्या सांभाळणाऱ्यांना (हँडलर्सना) परिस्थिती नियंत्रणात आणू दिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या कुत्र्याला प्रेमाने कुरवाळताना दिसल्या. या सर्व घटनेवरून रवीना टंडन यांचे प्राणी प्रेम दिसून येते.

Raveena Tandon Dog Attack
Influencer Death : धक्कादायक! Live स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची गोळ्या झाडून हत्या

मीडिया रिपोर्टनुसार, पापाराझींशी संवाद साधताना रवीना यांनी स्पष्ट केले की, त्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला नव्हता. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, रेड कार्पेटवर आणखी एक कुत्रा येत असल्याचे पाहून तो प्राणी उत्साही झाला होता आणि तो त्या परिस्थितीला प्रतिसाद देत होता, त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करत नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com