Urfi and Sakshi: मनोरंजन विश्वात नेहमीच कोणत्याना कोणत्या कलाकाराला ट्रोल केलं जातं. उर्फी जावेद या फॅशन डिझायनरची कला पाहून सगळेच थक्क झालेत. अतरंगी आणि हटके फॅशनमधून ती अगदी विचीत्र डिझाइन तयार करते. आता सोशल मीडियावर तिच्यासारखीच आणखीन एक अभिनेत्री व्हायरल होत असून तिला ट्रोल केलं जात आहे. (Marathi News)
९० च्या दशकात आलेलं 'रामायण' अनेकांनी पाहिलं असेल. रामानंद सागर निर्मित रामायणाचे आजही अनेक चाहते आहेत. रामानंद सागर यांची नात साक्षीदेखील मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. ती एक सोशल मीडिया इंफ्लूएन्सर असून लाखोंच्या घराच तिचा चाहचा वर्ग आहे.
आपल्या चाहत्यांसाठी साक्षी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहते. मात्र सध्या तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. साक्षी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उर्फीला फॉलो करतेय. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आता तिने देखील उर्फीला कॉपी करण्यास सुरुवात केली आहे.
उर्फी ज्या पद्धतीने आपल्या कपड्यांची फॅशन बदलत असते अगदी त्याचप्रमाणे साक्षी देखील स्टायलीश कपडे परिधान करत हॉट फोटोशूट करत आहे. तिचे हे फोटो पाहून नेटकरी आता तिला ट्रोल करत आहेत.
नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. यात एकानं उर्फीची (Urfi) बहीण कुल्फी, बर्षी असं तिला म्हटलंय. साक्षी चोप्रा ही एक गायिका देखील आहे. तिचं स्वत:च युट्यूब चॅनल आहे. त्यावर ती आपले व्हिडिओ पोस्ट करत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.