Pune Crime News: अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून अत्याचार; धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

Crime News: फिर्यादी अल्पवयीन मुलगी त्यावेळी इयत्ता सातवीत होती.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv

Pune News: पुण्यातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीडित मुलीने हा प्रकार शिक्षकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. पीडिता १६ वर्षीय असून तिने पोलिसांत या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून कोंढवा (Kondhava) पोलिस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पॉस्को) कायद्यांतर्गत तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News
Kolhapur Crime News: आयफोनवरून भावंडांमध्ये झाला वाद, रागाच्या भरात वडिलांनी पोटच्या लेकाला संपवलं

हा प्रकार २०१८ ते २०१९ दरम्यान घडला. अत्याचाराची ही घटना घडून ३ वर्षांचा काळ लोटला आहे. साल २०१८ ते २०१९ दरम्यान ही घटना घडली. मुन्ना (वय २६, रा. सोलापूर) (Solapur) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी त्यावेळी इयत्ता सातवीत होती.

ती घराशेजारी खेळत असताना एका घराच्या (Home) खिडकीतून खाली पडलेली वस्तू देण्यासाठी ती त्या घरात गेली. तेव्हा आरोपींनी तिला घरात ओढून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. तसेच, कोणाला सांगितल्यास कुटुंबियांना त्रास देण्याची धमकी दिली.

Pune Crime News
Yavatmal Crime News : यवतमाळ एलसीबीची माेठी कारवाई; तिघांकडून 4 लाख 82 हजारांच्या बनावट नाेटा जप्त

त्यामुळे पीडित मुलीने घाबरून हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार शाळेतील शिक्षकास सांगितला. त्यावेळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. इतर दोन आरोपी फरार असून, कोंढवा पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com