Yavatmal Crime News : यवतमाळ एलसीबीची माेठी कारवाई; तिघांकडून 4 लाख 82 हजारांच्या बनावट नाेटा जप्त

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
yavatmal, rs 500, lcb
yavatmal, rs 500, lcbsaam tv

- संजय राठोड

Yavatmal Crime News : चलनात वापरण्यात येणाऱ्या पाचशे रुपयाच्या बनावट नोटा घेऊन येणाऱ्या तिघांच्या मुस्क्या आवळण्यात यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाला (yavatmal local crime branch) यश आले आहे. या प्रकरणी पाेलिसांचा कसून तपास सुरु आहे. (Maharashtra News)

yavatmal, rs 500, lcb
Shivrajyabhishek Sohala : राष्ट्रवादी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा करणार शिवराज्याभिषेक साेहळा : जयंत पाटील (पाहा व्हिडिओ)

एलसीबीने तिघांकडून पाचशे रुपयांच्या 964 बनावट नाेटा असे एकूण किंमत 4 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने (lcb) यवतमाळच्या पुसद वाशिम रोडवरील मारवाडी फाटा येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

yavatmal, rs 500, lcb
Kolhapur News : जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा द्यावा : गांधीनगरच्या सिंधी समाजाची मागणी

विशाल पवार, विनोद राठोड, बालू कांबळे असे या बनावट नोटा सप्लाय करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांना पोलिसांनी गजाआड करून त्यांच्याकडून वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच या तिघांची कसून चाैकशी करण्याचे आदेश एसपींनी दिले आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात अमोल सांगळे , सागर भारस्कर, सुभाष जाधव, कुणाल मुंडकार, सोयल मिर्झा, मोहम्मद ताज, सुनील पंडागळे, दिगंबर गीते यांनी ही कारवाई केली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com