Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा धुमाकूळ, 7व्या दिवशीही कमावले तब्बल इतके कोटी

Riteish Deshmukh Movie: रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाने सातव्या दिवशीही दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर ५२.६५ कोटींचा टप्पा पार केला. प्रेक्षकांकडून ऐतिहासिक चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
Riteish Deshmukh Movie
Raja Shivaji Box Office Collectiongoogle
Published On

अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित करण्यात आला आणि सातव्याच दिवशी त्यांनी बजेटची अर्धी रक्कम वसूल केली. म्हणजेच बजेट हे १०० कोटींचे होते. तर त्यांनी त्याचा अर्धी रक्कम या सात दिवसांमध्ये कमवली.

राजा शिवाजी बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ७

राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित होऊन आता १ आठवडा झाला. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ३३.९ कोटी रुपयांची कमाई केली. आता सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सातव्या दिवशी या ऐतिहासिक चित्रपटाने ६,१२८ शोजमधून एकूण ४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर त्यातली हिंदी कमाई १.२५ कोटी रुपये आणि मराठी आवृत्तीतली कमाई २.७५ कोटी रुपयांची आहे. याची एकूण कमाई आपण जाणून घेऊयात.

Riteish Deshmukh Movie
High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरचा धोका टाळायचा आहे? आजच आहारातून गायब करा 'हे' ५ पदार्थ; आठवड्याभरात दिसेल फरक

मराठी आवृत्ती कलेक्शन

पहिल्या दिवसाचे कलेक्शन हे ८ कोटी रुपये झाले.

दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन हे ७. १५ कोटी रुपये झाले.

तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन हे ७.७५ कोटी रुपये झाले.

चौथ्या दिवसाचे कलेक्शन हे ४. २५ कोटी रुपये झाले.

पाचव्या दिवसाचे कलेक्शन हे ३.३५ कोटी रुपये झाले.

सहाव्या दिवसाचे कलेक्शन हे ३ कोटी रुपये झाले.

सातव्या दिवसाचे कलेक्शन हे २. ७५ कोटी रुपये झाले आहे.

म्हणजेच एकूण मराठी आवृत्तीत कलेक्शन हे ३५.२५ तर हिंदी आवृत्तीचे मिळून ५२.६५ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले आहे.

Riteish Deshmukh Movie
Bollywood Actress: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं; डिलेव्हरी बॉयने शिवीगाळही केली, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com