Raghav Chadha Ramp Walk: काय बोलता... परिणीतीचा होणारा नवरा राघव चड्ढा करणार सिनेसृष्टीत पदार्पण?; रॅम्पवॉक अन् कडक स्टाईल लूक व्हायरल

Raghav Chadha Ramp Walk Video: राघव चढ्ढांचा एक रॅम्पवॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ युजर्सने तुम्ही पण सिनेसृष्टीत पदार्पण करणार का असा प्रश्न विचारला.
Raghav Chadha Ramp Walk Viral Video
Raghav Chadha Ramp Walk Viral VideoTwitter

Raghav Chadha Ramp Walk Viral Video: आपचे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राचा गेल्या १३ मे ला साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर देखील कमालीचे व्हायरल झाले होते. अशातच राघव चढ्ढांचा एक रॅम्पवॉक करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फारच जुना असून या व्हिडीओच्या कमेंटमध्ये चाहते राघव चढ्ढा यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का? असा प्रश्न विचारला आहे, सध्या त्यांचा लूक कमालीचा चर्चेत आहे.

Raghav Chadha Ramp Walk Viral Video
Pusha 2 Story Leack: ‘पुष्पा २’ची स्टोरी लीक?, ‘श्रीवल्ली’ रश्मिकाचा चित्रपटातील ‘तो’ फोटो व्हायरल...

या जोडीने दिल्लीत १३ मे रोजी साखरपुडा आटोपला असून लवकरच येत्या काही दिवसांमध्ये ही जोडी लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती खुद्द परिणितीने दिली आहे. राघव- परिणीतीच्या साखरपुड्यात खास आऊटफिटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा दिसली होती. तिच्या लुकने सर्वांचेच लक्ष वेधले. प्रियंकाने नुकतेच या क्यूट जोडीचे फोटो शेअर केले असून त्यावर परिणीती प्रियांकाला कमेंट करत म्हणते, ‘मिमी दीदी, लवकरच तुला नवऱ्यामुलीला सगळी मदत करायची आहे.’

एका युजरने खासदार राघव चढ्ढा यांचा रॅम्पवॉक करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ Lakme Fashion Show 2022 चा आहे. या व्हिडीओवर नेटकरी म्हणतात, ‘जिजाजींची बॉलीवूडमध्ये एन्ट्री’ तर आणखी एक म्हणतो, ‘आपले जिजू हिरो बनतील.’ तर आणखी एक म्हणतो, ‘हे खासदार राघव चढ्ढा नाही तर, राघव जुयाल दिसतात.’ अशी कमेंट सध्या नेटकरी कमेंट करत आहेत.

Raghav Chadha Ramp Walk Viral Video
Actor Ray Stevenson Passes Away : RRR मधील व्हिलन साकारणाऱ्या कलाकाराचे निधन; वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा...

खासदार राघव चढ्ढा यांचा हा रॅम्पवॉक मध्ये पहिल्यांदाच सहभाग होता. हा रॅम्पवॉक पाहून नेटकरी चक्क झाले आहेत. या रॅम्पवॉकमध्ये राघव चढ्ढा यांनी लेदर जॅकेट घातलं होतं. राघव चड्ढा यांच्या रॅम्पवॉकचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथला येथे पार पडला. या जोडप्याचे साखरपुड्यातील रोमँटिक फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ही जोडी ऑक्टोबर महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. मात्र, अद्याप लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा या जोडप्याने केलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com