Actor Ray Stevenson Passes Away : RRR मधील व्हिलन साकारणाऱ्या कलाकाराचे निधन; वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा...

Actor Ray Stevenson : इंडिपेंडंट टॅलेंटने अभिनेते रे स्टीव्हनसन यांच्या निधनाची माहिती दिली.
Ray Stevenson
Ray StevensonSaam Tv

RRR Actor : ऑस्कर विजेते चित्रपट RRR अभिनेता रे स्टीव्हनसन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी २१ मे रोजी अर्थात रविवारी इटलीमध्ये निधन झाले आहे. इंडिपेंडंट टॅलेंटने अभिनेते रे स्टीव्हनसन यांच्या निधनाची माहिती दिली. अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून अवघी सिनेसृष्टी हळहळली आहे.

RRR चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली की, आपल्या सर्वांसाठी धक्कादायक बातमी! भावपूर्ण श्रद्धांजली, रे स्टीव्हनसन. तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात आहेत, सर स्कॉट.’

Ray Stevenson
Actor Sarath Babu Passes Away: दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा! 5 दशकं चाहत्यांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या अभिनेत्याचं निधन

रे स्टीव्हन्सन यांनी एसएस राजामौली दिग्दर्शित पीरियड अॅक्शन ड्रामा 'RRR' चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांसह सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला. चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी चित्रपटात कॅमिओ रोल साकारला होता. चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला होता.

Ray Stevenson
Aditya Singh Rajput Death : अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू, बाथरुममध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

यासोबतच, मार्वलच्या थोर या सिक्वेलमधील वोल्स्टॅग आणि वायकिंग्समधील इतर भूमिकांसाठी रे यांची सिनेसृष्टीत ओळख आहे. त्यांनी अॅनिमेटेड स्टार वॉर्स सीरिज 'द क्लोन वॉर्स' आणि रिबल्समध्ये गार सॅक्सनला आवाज दिला आहे.

यूएस मधील स्थित आउटलेट डेडलाइनने दिलेल्या माहितीनुसार, रे स्टीव्हनसनचा जन्म २५ मे १९६४ रोजी लिस्बर्न, नॉर्थ आयर्लंड मध्ये झाला. रे स्टीव्हनसीन यांनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला युरोपियन टीव्ही मालिका आणि टेलिफिल्म्समध्ये आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचे पहिले मोठे स्क्रीन क्रेडिट हेलेना बोनहॅम कार्टर आणि केनेथ ब्रानाघ यांना जाते. पॉल ग्रीनग्रासच्या १९९८ मधील नाटक 'द थिअरी ऑफ फ्लाइट' मध्ये देखील प्रमुख भूमिका त्यांनी साकारली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com