
Pushpa 2 Suspense Revealed: अल्लु अर्जुन प्रमुख भूमिकेत असलेला ‘पुष्पा: द रूल’ ची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. पुष्पाचा पहिला भाग अर्थात ‘पुष्पा: द राईज’ हा चित्रपट २०२१ ला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या कथेने, डायलॉग्सने आणि गाण्यांनी चारचाँद लावले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यानंतर लवकर चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटातील एक सीन व्हायरल होत आहे, त्यामुळे नेटकरी सध्या चित्रपटाची स्टोरी लीक झाली का? असा सवाल विचारला जात आहे.
अल्लु अर्जूनच्या वाढदिवसाच्या दिवशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, तर त्या आधी अल्लु अर्जुनचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. अशातच चित्रपटाची सध्या सर्वांनाच उत्सुकता लागली असताना, चित्रपटाची स्टोरी लीक झाली की काय असा सवाल नेटकरी सध्या विचारत आहे. हा फोटो एका युजरने शेअर केला असून यामध्ये रश्मिका मंदान्ना अर्थात ‘श्रीवल्ली’ मृत्युशय्येवर झोपलेली दिसत आहे. सध्या या सोशल मीडियावर स्टोरीची चर्चा तुफान होत आहे.
ट्वीटरवर व्हायरल होत असलेला फोटोमध्ये, रश्मिका मंदान्ना ‘श्रीवल्ली’ मृत्युशय्येवर झोपलेली दिसत आहे. तिच्या शेजारी अनेक मृतदेह ठेवण्यात आले आहे, असे दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, अनेक जण त्या मृतदेहाच्या बाजूला बसून शोक व्यक्त करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये ‘श्रीवल्ली’ मरणार अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे, व्हायरल फोटो पाहून चाहते दु:खी झालेले दिसत आहे. फोटो पाहून अनेक युजर्सने ‘पुष्पा: द रूल’ची वेगवेगळी कथा डोक्यात सेट करत आहेत. एक युजर कमेंट करत म्हणतो, “पुष्पातील खलनायक भवर सिंह शेखावत सोबतच्या फायटिंग सीनमध्ये पुष्पा त्याची पत्नी गमावेल आणि मग तो तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी येईल.”
मात्र, त्या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये ‘पुष्पा’ कुठेच दिसत नाही. अशा परिस्थितीत हा व्हिडीओ इतर कोणत्या तरी चित्रपटाशी संबंधित असू शकतो. मात्र, या व्हायरल होणाऱ्या सीनबद्दल निर्मात्यांनी कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.