Inder Kaur: प्रसिद्ध गायिकेची हत्या, बंदुकीचा धाक दाखवत अपरहण; नंतर खून करून मृतदेह कालव्यात फेकला

Punjabi Singer Inder Kaur Killed: पंजाबमधील प्रसिद्ध गायिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. बंदुकीचा धाक दाखवत ६ दिवसांपूर्वी तिचे अपहरण करण्यात आले होते. कालव्यामध्ये तिचा मृतदेह आढळून आला.
Punjabi Singer death
Punjabi Singer Inder Kaur KilledSaam tv
Published On
  • पंजाबमधील प्रसिद्ध गायिकेची हत्या

  • इंदर कौरच्या हत्येमुळे उडाली खळबळ

  • लग्नाला नकार दिल्याने गायिकेची हत्या

  • कालव्यात सापडला मृतदेह

पंजाबची प्रसिद्ध गायिका इंदर कौर उर्फ यशिंदर कौरची हत्या करण्यात आली. २९ वर्षीय इंदर कौरचा मृतदेह सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास निलो कालव्यात सापडला. सहा दिवसांपूर्वी बंदुकीचा धाक दाखवत इंदर कौरचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस आणि तिचे कुटुंबीय तिचा शोध घेत होते. इंदरचा शोध घेत असताना पोलिसांना तिचा मृतदेह कालव्यात सापडला. हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

इंदर कौरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मोगा येथे राहणारा तरुण इंदरवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. इंदरने त्याला लग्नासाठी नकार दिला होता. त्यानंतर त्याने बंदुकीचा धाक दाखवत तिचे अपहरण केले होते. आरोपीने हत्येचा पूर्वनियोजिक कट रचला होता. याच उद्देशाने तो कॅनडाहून नेपाळमार्गे पंजाबला आला होता. इंदरची हत्या केल्यानंतर तो नेपाळमार्गे कॅनडाला पळून गेला.

Punjabi Singer death
Famous Singer Death: संगीतविश्वाला मोठा धक्का; ज्येष्ठ गायकाचे निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

इंदरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ३ वर्षांपूर्वी इंदरची इन्स्टाग्रामवरून आरोपीशी मैत्री झाली होती. नंतर इंदरला कळाले होते की आरोपीचे आधीच लग्न झाले असून त्याला मुलं देखील आहेत. त्यामुळे तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी चिडला होता. याच रागातून त्याने इंदरचे अपरहण करून हत्या केली, असा आरोप इंदरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Punjabi Singer death
Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात निधन; २४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वावर शोककळा

पोलिसांनी कालव्यातून इंदरचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून संशयिताचा शोध घेत आहेत. अशी देखील माहिती समोर आली आहे की, इंदर कौरचे आई-वडील आणि भाऊ कोरियामध्ये राहतात. तर तिचा एक भाऊ लुधियानाच्या जमालपूर भागात राहतो. या घटनेमुळे इंदरच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Punjabi Singer death
Famous Singer Death : संगीत विश्वावर शोककळा; दिग्गज गायकाचे निधन, मूत्रपिंडाच्या आजाराशी सुरू होती झुंज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com