Famous Singer Death: हॉलिवूड संगीतविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध सोल आणि ब्लूज गायक क्लॅरेन्स कार्टर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून क्लॅरेन्स कार्टर यांना 'स्टेज 4' प्रोस्टेट कॅन्सर आणि न्यूमोनिया होता. त्यांची अखेर अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि १३ मे रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे जागतिक संगीतविश्वात शोककळा पसरली असून चाहते आणि कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
क्लॅरेन्स कार्टर हे त्यांच्या दमदार आवाजासाठी आणि इमोशनल गाण्यांसाठी ओळखले जात होते. पॅचेस, स्लिप अवे, बॅक डोअर सांता आणि स्ट्रोकिन यांसारख्या गाण्यांमुळे त्यांनी जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता मिळवली होती. विशेषतः 'पॅचेस' या गाण्यामुळे त्यांना मोठं यश मिळालं आणि हे गाणं आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.
अलाबामा येथील मॉन्टगोमेरीमध्ये जन्मलेल्या क्लॅरेन्स कार्टर यांनी लहानपणापासूनच दृष्टी गमावली होती. मात्र या अडचणींवर मात करत त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ते स्वतः गिटार शिकले आणि पुढे संगीत विषयात शिक्षणही घेतलं. त्यांच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे ते अमेरिकन सोल म्युझिकमधील मोठं नाव बनले.
क्लॅरेन्स कार्टर यांनी १९६० आणि ७० च्या दशकात अनेक सुपरहिट गाणी दिली. त्यांच्या गाण्यांमध्ये प्रेम, संघर्ष आणि आयुष्यातील वास्तव यांचा उत्तम संगम दिसून येत असे. त्यांच्या खास शैलीमुळे ते इतर गायकांपेक्षा वेगळे ठरले. अनेक संगीत समीक्षकांनी त्यांना सोल म्युझिकच्या सुवर्ण काळातील महत्त्वाचा आवाज म्हटलं आहे.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी प्रसिद्ध गायिका कॅन्डी स्टॅटन यांच्यासोबत विवाह केला होता. दोघांना एक मुलगाही आहे. मात्र काही वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. क्लॅरेन्स कार्टर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अनेकांनी त्यांच्या गाण्यांच्या आठवणी शेअर करत “सोल म्युझिकचा एक युग संपलं,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.