Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

Musician Death: भारतीय शास्त्रीय संगीतविश्वातील दिग्गज तबला वादक उस्ताद साबिर खान यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.
Ustad Sabir Khan
Ustad Sabir KhanSaam Tv
Published On

Musician Death: भारतीय शास्त्रीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रख्यात तबला वादक उस्ताद साबिर खान यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीताच्या एका सुवर्ण पर्वाचा अंत झाल्याची भावना संगीतप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे.

उस्ताद साबिर खान हे फर्रुखाबाद घराण्याचे प्रमुख आणि अत्यंत मानाचे कलाकार होते. तबल्याच्या दुनियेत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या तबल्याच्या ठेक्यांमध्ये परंपरा, शिस्त आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असे. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक दिग्गज कलाकारांसोबत रंगमंच गाजवला.

Ustad Sabir Khan
Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

४ डिसेंबर १९५९ रोजी उत्तर प्रदेशातील रामपूर येथे उस्ताद साबिर खान यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना संगीताचे संस्कार लाभले. आजोबा उस्ताद मसित खान आणि वडील उस्ताद करामतुल्ला खान यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबल्याचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळवली.

Ustad Sabir Khan
Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

उस्ताद अमजद अली खान, पंडित रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि विदुषी गिरिजा देवी यांसारख्या महान कलाकारांसोबत त्यांनी अनेक संस्मरणीय मैफिली सादर केल्या होत्या. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

उस्ताद साबिर खान यांनी केवळ कलाकार म्हणूनच नव्हे, तर गुरु म्हणूनही मोठे योगदान दिले. ‘उस्ताद करामतुल्ला खान म्युझिक सोसायटी’च्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. त्यांच्या निधनानंतर संगीतविश्वातून शोक व्यक्त केला जात असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com