Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Raja Shivaji Box Office: रितेश देशमुखचा चित्रपट 'राजा शिवाजी' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन १४ दिवस उलटले आहेत. हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठण्यापासून अजूनही खूप दूर आहे. गुरुवारी, या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे.
Raja Shivaji
Raja Shivaji Saam tv
Published On

Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक पिरियड ड्रामा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित होऊन तब्बल १४ दिवस उलटले असले तरी चित्रपटाला अद्याप १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठता आलेला नाही. मात्र मराठी प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बॉक्स ऑफिस आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

sacnilk.com च्या माहितीनुसार, १४ मे रोजी चित्रपटाने भारतात १.९० कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, बुधवारी देखील चित्रपटाने इतकीच कमाई केली होती. त्यामुळे दोन दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये कोणतीही वाढ अथवा घट दिसून आली नाही. हा चित्रपटाचा दुसरा गुरुवार होता. त्यामुळे या विकेंडला चांगली कमाई होईल अशी अपेक्षा आहे.

Raja Shivaji
Raja Shivaji Review: रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

पहिल्या आठवड्यात ‘राजा शिवाजी’ने ५२.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २४.३० कोटी रुपयांची कमाई केली. अशा प्रकारे, १४ दिवसांतील चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ७६.९५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Raja Shivaji
Raja Shivaji: 'राजा शिवाजी'ची तुफान क्रेझ; बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणार, अॅडव्हान्स बुकिंगसाठी धडाकेबाज सुरुवात

हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र हिंदीपेक्षा मराठी व्हर्जनला प्रेक्षकांचा जास्त प्रतिसाद मिळत आहे. हिंदी व्हर्जनने १४ दिवसांत २२.४० कोटी रुपयांची कमाई केली, तर मराठी व्हर्जनने तब्बल ५४.५५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

प्रेक्षक उपस्थितीच्या बाबतीतही मराठी शो आघाडीवर आहेत. मराठी भाषेतील सकाळच्या शोमध्ये ७.४३ टक्के उपस्थिती होती. दुपारच्या शोमध्ये १७ टक्के, तर संध्याकाळच्या शोमध्ये १६.७१ टक्के उपस्थिती नोंदवण्यात आली. त्यामुळे मराठी शोची एकूण ऑक्युपन्सी १३.७१ टक्के राहिली. दुसरीकडे, हिंदी व्हर्जनमध्ये सकाळच्या शोमध्ये केवळ ४.०८ टक्के उपस्थिती होती. दुपारच्या शोमध्ये १०.०८ टक्के आणि संध्याकाळच्या शोमध्ये १४ टक्के उपस्थिती नोंदली गेली. हिंदी व्हर्जनची एकूण उपस्थिती १०.७० टक्के राहिली.

राजा शिवाजी’मध्ये रितेश देशमुखने मुख्य भूमिका साकारण्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. चित्रपटात जेनेलिया डिसूझा, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, भाग्यश्री, सचिन खेडेकर, फरदीन खान आणि जितेंद्र जोशी यांसारखे दिग्गज कलाकार झळकले आहेत. तसेच सलमान खानचा खास कॅमिओही चित्रपटात पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com