

सुपरस्टार प्रभासच्या टीमचा भीषण अपघात
फौजी चित्रपटाच्या शुटिंगवेळी सेटवर जाताना अपघात
एकाचा जागीच मृत्यू तर पाचजण जखमी
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या नवीन चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. प्रभासच्या फौजी चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. दरम्यान चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एक धक्कादायक घटना घडला आहे. हे शुटिंग अचानक थांबवावं लागलं आहे. चित्रपटाच्या टीमचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
हैदराबादमध्ये भीषण अपघात (Prabhad Fauzi Movie Crew Member Road Accident in Hyderabd)
फौजी चित्रपटाचे शुटिंग (Fauzi Movie Shooting Accident) सध्या हैदराबादमध्ये सुरु आहे. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान प्रवास करत असताना टीमच्या एका वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका क्रू मेंबरचा जागीच मृत्यू झाला असून पाचजण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुटिंगसाठी निघालेल्या गाडीचा भीषण अपघात
मिडिया रिपोर्टनुसार, फौजी चित्रपटाचे शुटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये होत आहे. चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेटवर जाण्यासाठी निघाल्यावर हा अपघात झाला. हैदराबादजवळील अब्दुल्लापुरमेटजवळ हा अपघात झाला आहे. येथे वाहनाचा ताबा सुटला आणि थेट गाडी डिव्हायडरला आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाचजण जखणी झाले आहे.
क्रू मेंबर्सच्या कुटुंबियांना दिली माहिती
फौजी चित्रपटाच्या क्रू मेंबर्सच्या मृत्यूची बातमी खूप वेगाने पसरली. अजूनही प्रभासकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. क्रू मेंबर्सच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे फौजी चित्रपटाचे शुटिंग तात्काळ थांबवण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.