
कोकणातील लोकप्रिय युट्यूबर शिरीष गवस यांचं आज शनिवारी निधन झालं. शिरीष यांचं वयाच्या ३३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शिरीष गवस यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिरीष गवस हे कोकणातील खाद्यसंस्कृतीविषयी युट्यूब व्हिडिओ तयार करायचे. शिरीष यांनी चाहत्यांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. शिरीष गवस यांचा मेंदूच्या आजारामुळे मृत्यू झाल्याची प्रथामिक माहिती आहे.
शिरीष यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज शनिवारी उपाचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका वर्षाभरापूर्वीच शिरीष यांच्या पत्नीने चिमुकल्या मुलीला जन्म दिला होता. शिरीष यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शिरीष आणि पूजा मुंबईतील वास्तव्य सोडून कोकणात राहायला आले होते. शिरीष मुंबईतील सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. तर त्यांची पत्नी पूजा यांनी जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलं आहे. त्या कुशल फाइन आर्टिस्ट आहेत. त्यांनी पुढे पुण्यातील एफटीआयमधून प्रॉडक्शन डिझाइनमध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी बॉलिवूडमध्ये सात वर्ष आर्ट डायरेक्टर म्हणूनही काम केलं आहे.
'रेड सॉइल स्टोरीज' या त्यांच्या युट्यूब चॅनेलवरून कोकणी खाद्यपदार्थाविषयी रेसिपीज शेअर केल्या जात होत्या. त्यानंतर स्थानिक सण-उत्सव, शेती, जंगलातील नैसर्गिक संसाधने, स्थानिक जीवनशैली लोकांपर्यंत पोहोचू लागले.
शिरीष गवस यांचा ४० पेक्षा अधिक देशांमध्ये प्रेक्षक वर्ग तयार झाला होता. मुंबई शहरातील जीवनशैली सोडून त्यांनी ठाम निर्णय प्रभावी ठरला. शिरीष यांनी कोकणातील वैभवशाली संस्कृतीचा प्रभावी प्रचार करणारी एक मोलाची भूमिका बजावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.