Brain Health: मेंदू निरोगी ठेवायचा आहे? मग 'हे' धोकादायक पदार्थ खाणे टाळा

Dhanshri Shintre

अतिप्रमाणात साखर

जास्त प्रमाणात साखर सेवन केल्याने मेंदूत दाह होतो, स्मरणशक्ती कमजोर होते आणि शिकण्याची क्षमता कमी होते.हे पेये स्मरणशक्तीला हानी पोहोचवू शकतात.

Brain Health | Freepik

प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ

पॅकेज्ड स्नॅक्स, फास्ट फूड आणि तयार खाण्याच्या पदार्थांमध्ये असलेले ट्रान्स फॅट्स आणि संरक्षक पदार्थ मेंदूच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम करतात. हे पदार्थ खाल्ल्याने मेंदूला सूज येऊ शकते.

Brain Health | Freepik

फ्रायड फूड्स

सतत तळलेले पदार्थ खाल्ल्याने मेंदूत दाह निर्माण होतो आणि मेंदूतील न्यूरॉन्सचे नुकसान होऊ शकते.

Brain Health | Freepik

मैद्याचे पदार्थ

जसे की व्हाइट ब्रेड, केक आणि कुकीज यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते आणि मेंदूतील सूज व थकवा वाढवतो.

Brain Health | Freepik

अल्कोहोलचा अतिरिक्त वापर

जास्त मद्यपान केल्याने मेंदूतील न्यूरो ट्रान्समीटरमध्ये गडबड होते, निर्णयक्षमता कमी होते आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

Brain Health | Freepik

प्लास्टिक पॅकिंगमधील अन्न

बीपीए (BPA) युक्त प्लास्टिक पॅकिंगमधून विषारी रसायने अन्नात मिसळू शकतात, जे मेंदूच्या आरोग्यास अपायकारक असतात.

Brain Health | Freepik

जास्त प्रमाणात कॅफिन

जास्त कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स घेणे मेंदूतील झोपेचे चक्र बिघडवते आणि दीर्घकालीन थकवा व एकाग्रतेत घट आणते.

Brain Health | Freepik

NEXT: आरोग्यवर्धक ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिडसाठी खाण्याच्या ५ सर्वोत्तम गोष्टी

येथे क्लिक करा