Pawan Kalyan: शपथ घेतल्यानंतर पवन कल्याणने केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष; इंटरनेटवर Video Viral
Pawan Kalyan Deputy CM Oath VideoGoogle

Pawan Kalyan Video: शपथ घेतल्यानंतर पवन कल्याणने केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष; इंटरनेटवर Video Viral

Pawan Kalyan Deputy CM Oath Video: बुधवारी विजयवाडा येथे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली. तर साउथ सुपरस्टार पवन कल्याण यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी पवन कल्याण यांनी केलेल्या एका कृतीन सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. बुधवारी विजयवाडा येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा उपस्थित होते. यावेळी रजनीकांत आणि त्यांची पत्नीसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बडे स्टार्सही उपस्थित होते.

पवन कल्याण उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना अभिनेता आणि माजी मंत्री चिरंजीवी देखील उपस्थित होता. चिरंजीवी बंधू पवन कल्याणला मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन देत होता. पवन कल्याण शपथ घेत असताना चिरंजीव त्याने टाळ्या वाजवत त्यांचं अभिनंदन केलं. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पवण कल्याणने केलेल्या एका कृतीने अनेकांचे लक्ष वेधले असून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

शपथ घेतल्यानंतर पवण कल्याण मोठ्या भावाचा म्हणजेच चिरंजीवी यांचा आशीर्वाद घेतला. भर व्यासपीठवर पवण कल्याणने भावाच्या पायांना स्पर्श करत आशीर्वाद घेतला. त्याच्या कृतीने अनेकांचं लक्ष वेधलं. चिरंजीवीच्या पाया पडण्यापूर्वी पवन कल्याणने आधी स्वतःच्या पायातील चप्पल काढली. मग चिरंजीवीच्या पाया पडला. हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय.

पवन कल्याणचे चिरंजीवीबद्दलचे प्रेम आणि आपुलकी पाहून लोक भावूक झालेत. शपथ घेतल्यानंतर पवन कल्याणने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली की, त्यांनी पाहुण्यांमध्ये उपस्थित असलेला मोठा भाऊ चिरंजीवी याला भेटावं. पंतप्रधान मोदींनी लागलीच त्यांच्या विनंतीला मान दिला आणि चिरंजीवी यांची भेट घेतली.

ज्यावेळी मोदींनी चिरंजीव यांचे भेट घेतली त्यावेळी पवन कल्याण यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मोदींची भेट घेऊन चिरंजीव यांनाही आनंदा झाल्याचं दिसलं. मोदींनी दोन्ही भावांना व्यासपीठासमोर आणत दोघांचे हात वरती जनतेचे आभार मानले. शपथविधी कार्यक्रमातील हा एक क्षण खूप व्हायरल होतोय.

पवन कल्याणने त्याचा मोठा भाऊ चिरंजीवीवर किती प्रेम करतो हे अनेकदा सांगितले आहे. आज जर मी तुमच्यासमोर आहे आणि तुम्ही मला स्टार म्हणून पाहत असाल तर याचे श्रेय माझ्या भावाला जाते, असेही तो एकदा म्हणाले. एकेकाळी माझी मनस्थिती अशी होती की मला आत्महत्या करू वाटत होती. पण त्या वाईट काळात मला माझा मोठा भाऊ चिरंजीवी यांची साथ मिळाली आणि त्यांनी मला समजावून सांगितले. नुसते समजावले नाही तर प्रोत्साहनही दिल्याचं ते म्हणाले.

Pawan Kalyan: शपथ घेतल्यानंतर पवन कल्याणने केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष; इंटरनेटवर Video Viral
Chandrababu Naidu: मोठी बातमी! आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com