Ram Gopal Varma : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाची राजकारणात एन्ट्री, उमेदवारी जाहीर करत पवन कल्याण यांना दिलं ओपन चॅलेंज, म्हणाले...

Ram Gopal Varma Political News : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबाबत मोठी माहिती हाती आली आहे. राम गोपाल वर्मा यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत राजकारणात प्रवेश केल्याची माहिती दिली.
Ram Gopal Varma
Ram Gopal VarmaSaam Tv
Published On

Ram Gopal Verma :

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबाबत मोठी माहिती हाती आली आहे. राम गोपाल वर्मा यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत राजकारणात प्रवेश केल्याची माहिती दिली. राम गोपाल वर्मा यांनी आगामी निवडणूक ही आंध्र प्रदेशच्या पीठापूरममधून लढवणार असल्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

राम गोपाल वर्मा हे स्टार पवन कल्याण यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. पीठापूरम मतदारसंघात राम गोपाल वर्मा यांच्या एन्ट्रीने राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात राम गोपाल वर्मा आणि पवन कल्याण अशी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, राम गोपाल वर्मा हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Ram Gopal Varma
Mamata banerjee injured : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत, कोलकातामधील रुग्णालयात उपचार सुरु

राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं की, 'अचानक निर्णय घेतला. मला ही बातमी शेअर करताना आनंद होत आहे की, मी पीठापूरममधून निवडणूक लढवणार आहे. राम गोपाल यांच्या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पवन आणि रोम गोपाल वर्मा कोण जिंकणार?

दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी पहिल्यांदा राजकीय एन्ट्री केली आहे. त्यांनी सिनेसृष्टीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. राम गोपाल वर्मा यांचा मोठा चाहता वर्ग आहे. राम गोपाल वर्मा यांची थेट पवन कल्याण विरोधात लढाई होणार आहे. या दोन्ही उमेदवारांपैकी कोण जिंकणार , हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.

Ram Gopal Varma
Sindhudurg Ratnagiri Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला; उमेदवार कोण असणार? देवेंद्र फडणवीसांनी सर्वकाही सांगितलं

दरम्यान, पवन कल्याण हे जनसेवा पक्षाचे प्रमुख आहेत. पवन कल्याण यांनी भाजप आणि तेलगू देसम पक्षाशी आघाडी केली आहे. पवन कल्याण हे पीठापुरनम मतदारसंघाचे उमेदवार असणार आहेत. तर त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनीही उमेदवारीची घोषणा केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com