Jhoome Jo Pathaan: 'झूमे जो पठान' लवकरच तोडणार रेकॉर्ड, 30 मिनिटात मिळाले 'इतके' व्ह्यूज

'झूमे जो पठान' गाण्याला अवघ्या 30 मिनिटांत मिळाले 10 लाख व्ह्यूज.
Jhoome Jo Pathaan Song
Jhoome Jo Pathaan Song Saam Tv
Published On: 

Jhoome Jo Pathaan Trend: बॉलिवूड किंग खानच्या 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून अनेक वाद सुरू आहेत. अशातच या चित्रपटातील दुसरे गाणे काल (२२ डिसेंबर, २०२२) प्रदर्शित झाले. प्रदर्शित होताच हे गाणे ट्रेंड होऊ लागले. YouTube वर 'झूमे जो पठान' या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.

'झूमे जो पठान' या गाण्याला अवघ्या 30 मिनिटांत 10 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या गाण्याला अवघ्या 21 तासांत 18 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला मिळणाऱ्या व्ह्यूज वेग बघता हे गाणे 'बेशरम रंग'चा रेकॉर्ड लवकरच मोडेल. 'झूमे जो पठान' हे गाणे अरिजित सिंगने गायले आहे.

Jhoome Jo Pathaan Song
Avatar: The Way of Water: 'अवतार 2' मधील किरी 14 वर्षाची नसून..., अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

शाहरुख खान बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. मात्र, याआधी या दोन्ही कलाकारांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख खान त्याच्या 'पठान' या नव्या चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. या चित्रपटात त्याच्या लांब केसांसोबतच सिक्स पॅक अॅब्स देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. (Shah Rukh Khan)

पठान चित्रपटातील 'झूमे जो पठान' हे गाणे अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातील दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. तसेच दीपिका या चित्रपटामध्ये अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. शाहरुखही खूप हँडसम दिसत आहे. (Deepika Padukone)

गाणे प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खानने 'झूम जो पठान'चे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यामध्ये त्याने 'झूमे जो पठान, मेरी जान' या गाण्याची एक ओळ लिहिली होती. 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली होती. ज्यामुळे बराच वाद झाला होता. शाहरुख आणि दीपिकाचा 'पठान' चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com