Avatar: The Way of Water: 'अवतार 2' मधील किरी 14 वर्षाची नसून..., अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

जेक सुली आणि नेतिरीच्या मुलांपैकी एकाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सिगॉर्नी वीव्हरने साकारली आहे.
Avatar: The Way of Water Poster Out
Avatar: The Way of Water Poster OutSaam Tv

 Avatar: The Way of Water: जेम्स कॅमेरॉनच्या यांनी त्यांच्या 'अवतार' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. अवतारच दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. परंतु जेम्स कॅमरॉन यांना अवताराचा दुसरा भाग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी १३ वर्ष लागली.

'अवतार: द वे ऑफ वॉटर'मधील दृश्ये पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत. चित्रपटातील पाण्याखालील दृश्ये दाखविण्यापासून ते त्यातील सर्व कलाकार आणि प्राण्यांचे अभिव्यक्ती अचूकपणे चित्रित करण्यापर्यंत सगळंच अप्रिम आहे. जेम्स कॅमेरॉनच्या चित्रपटाच्याबाबत आणखी एक खुलसा केला आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

जेक सुली आणि नेतिरीच्या मुलांपैकी एकाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सिगॉर्नी वीव्हरने साकारली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीचे वय 73 आहे. तर ती चित्रपटात अवघ्या 14 वर्षांच्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. ही गोष्ट जितकी आश्‍चर्यकारक आहे तितकीच यामागचं कारणही रंजक आहे.

'अवतार: द वे ऑफ वॉटर'मध्ये जेक सुली आणि नेतिरी यांची चार मुले होती. याशिवाय दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली होती, तिचे नाव किरी होते. किरी हे 'अवतार 2' मधील मुख्य पात्रांपैकी एक आहे. सिगॉर्नी वीव्हरने हे पात्र उत्तम प्रकारे साकारले आहे. 'अवतार 2' मधील जेक आणि नेतिरी हे किरीचे खरे पालक नाहीत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल तिचे खरे पालक कोण आहेत? किरी ही पहिल्या भागात दाखवलेली डॉ. ग्रेस ऑगस्टस यांची मुलगी आहे, जिला जेकने दत्तक घेतले आहे. 'अवतार 2' मध्ये सिगॉर्नी वीव्हरने तिची मुलगी किरीची भूमिका साकारली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

काही माध्यमांनी चित्रपटासाठी केलेल्या या अनोख्या कास्टिंगबद्दल काही दावे केले आहेत. त्यानुसार, 'किरीच्या या पात्रासाठी सिगॉर्नी वीव्हरची निवड करण्यात आली होती. कारण पहिल्या भागात, डॉ. ग्रेसच्या मृत्यूनंतर, तिचे कनेक्शन अवाशी जोडले गेले होते आणि अवतार 2 मध्ये, किरीचे कनेक्शन अवाशी जोडलेले आहे. या भूमिकेसाठी जेम्स कॅमेरूनने सिगॉर्नीची निवड करण्याचे हे एक मोठे कारण असू शकते.

73 वर्षांची असूनही या चित्रपटात 14 वर्षांच्या मुलीची भूमिका करणे सिगॉर्नीसाठी खूप आव्हानात्मक होते. कारण तिला त्यानुसार प्रतिक्रिया द्यावी लागत होती. या व्यक्तिरेखेसाठी सिगॉर्नीला इतक्या मोठ्या वयात तिचा नखरा आणावा लागला.

सिगॉर्नीने साकारलेल्या या भूमिकेबद्दल अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला होता. सिगॉर्नी वीव्हर म्हणाली, 'आमच्यापैकी अनेकांना ते वय चांगले आठवत आहे ज्यात आम्ही कुठेही बसत नाही. आम्हाला समजले की लोकांऐवजी, ही मुलगी निसर्ग आणि झाडे आणि वनस्पतींशी अधिक जोडलेली आहे. जेम्स कॅमेरॉनने तिला भूमिकेची ऑफर देताना तिला काय सांगितले हे देखील अभिनेत्रीने स्पष्ट केले, 'मला आठवते की जीमने सांगितले होते, तू वास्तविक जीवनात ज्या प्रकारे वागतोस तसेच आहे, तू फक्त 14 वर्षांची आहेस, हे करणे सोपे आहे. तू करू शकतेस.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com