Vinod Suryavanshi : "सिलेक्शननंतर शूटिंगसाठी सेटवर गेलो, पण डायरेक्टरने रंग पाहून घरी पाठवलं", 'पंचायत' फेम अभिनेत्याने सांगितला भयंकर किस्सा

Vinod Suryavanshi Rejected For Dark Skin : 'पंचायत' फेम अभिनेत्याने आपला इंडस्ट्रीतील संघर्षाचा काळ सांगितला. सुरुवातीला त्याला रंगावरून नाकारण्यात आले होते.
Vinod Suryavanshi Rejected For Dark Skin
Vinod SuryavanshiSAAM TV
Published On
Summary

'पंचायत' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला रंगामुळे नाकारण्यात आले होते.

सिलेक्शननंतरही शूटिंगला पोहचल्यावर अभिनेत्याला घरी पाठवले.

अभिनेत्याने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'पंचायत' सीरिजला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. 'पंचायत' वेब सिरीजच्या तिसऱ्या पर्वात नवीन सचिवजी यांची भूमिका साकारणारे अभिनेते विनोद सूर्यवंशी सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. त्यांना 'पंचायत' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्यांचा इंडस्ट्रीतील संघर्ष जाणून घेऊयात. सिद्धार्थ कन्नन यांच्याशी संवाद साधताना विनोद सूर्यवंशी यांनी आपल्या संघर्षाच्या काळाविषयी उलगडा केला. विनोद सूर्यवंशी यांना आपल्या दिसण्यावरून अनेकदा ट्रोल केले गेले आणि त्यांच्या हातून अनेक भूमिका गेल्या.

विनोद यांनी मुलाखतीत सांगितले की, "माझ्या दिसण्यामुळे मला अनेकदा नाकारले गेले. जेव्हा मी टीव्ही मालिकांसाठी ऑडिशन्स द्यायचो, तेव्हा त्यांना अनेकदा 'श्रीमंत दिसणारा' चेहरा हवा असायचा. अगदी एखाद्या भिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठीही त्यांना श्रीमंत दिसणाराच कलाकार हवा असायचा. 'तुम्ही आमच्या निकषांमध्ये बसत नाही,' असे सांगून मला नाकारले जायचे..."

पुढे विनोद म्हणाला की, "एका मालिकेत 'घरकाम करणाऱ्या नोकराची' भूमिका साकारण्यासाठी माझी निवड झाली होती. कास्टिंग टीमने माझ्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि मी शूटिंगच्या ठिकाणी वेळेवर पोहोचलो. पण जेव्हा त्या मालिकेच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर तिथे आल्या, तेव्हा त्यांनी विचारले, 'हा कोण आहे?' जेव्हा त्यांना सांगण्यात आले की, मी त्या भूमिकेसाठी निवडलेला कलाकार आहे, तेव्हा त्या म्हणाल्या, 'नाही, हे चालणार नाही. आम्हाला गोऱ्या रंगाचा कलाकार हवा आहे. हा तर सावळ्या रंगाचा आहे... याला परत पाठवून द्या."

चित्रपटसृष्टीविषयी बोलताना ते म्हणाले की, "मी चुकूनच चित्रपटसृष्टीत आलो. माझ्या एका मित्राने मला फोन केला आणि सांगितले की, एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गर्दीमध्ये (Crowd) उभे राहून तू ५०० रुपये कमवू शकतोस.मला ही गोष्ट खूप आवडली की, मला इथे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि दिवसाच्या शेवटी ५०० रुपये मिळायचे. मी यापूर्वी केलेल्या कोणत्याही कामापेक्षा हे काम मला अधिक चांगले वाटले. त्यामुळेच मी हे काम पुढेही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे मी 'ज्युनियर आर्टिस्ट' म्हणून काम करण्यास सुरुवात केली."

वर्कफ्रंट

विनोद यांनी अक्षय कुमारसोबत 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटातही काम केले आहे, तसेच ते 'जनावर' या वेब सीरिजचा एक भाग होते. त्यांनी 'चलती का नाम गाडी' या मालिकेतही काम केले.

Vinod Suryavanshi Rejected For Dark Skin
Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com