Manasvi Choudhary
आचार्य चाणक्य हे महान ज्ञानी मानले जातात. त्यांनी चाणक्य निती या त्यांच्या ग्रंथात व्यक्तीच्या जीवनाविषयी अनेक गुपिते सांगितले आहेत.
चाणक्यांचा असा विश्वास आहे की माणसाचे भाग्य हे केवळ कठोर परिश्रम केल्याने नाही तर दानधर्म केल्याने देखील बदलते.
आचार्य चाणक्यांनुसार, तुमच्या कमाईतला छोटासा भाग तुम्ही या ४ मार्गाने खर्च केला तर तुम्ही धनवाल व्हाल.
चाणक्य म्हणतात की, आजारी व्यक्तींना मदत केल्याने त्यांच्या उपचारासाठी पैसे खर्च केल्याने माता देवीचा आशीर्वाद मिळतो असे केल्याने केवळ पुण्यच नाही तर संकटेही दूर होतात.
शिक्षणासाठी दान करणे यापेक्षा मोठे दान कोणतेच नाही असं चाणक्य सांगतात. जे कोणी गरीब, गरजू मुले असतील त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करावा यामुळे तुमचे भाग्य उजळून निघेल.
अनाथआश्रम, मंदिर, धर्मशाळा यासांरख्या सामाजिक कार्यात दान करणे शुभ मानले जाते. चाणक्यांच्या मते, समाजासाठी काम करत राहणे कधीही वाया जात नाही. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याची परतफेड होतच राहते.
चाणक्यांच्या महत्वाच्या सल्ल्यापैकी एक म्हणजे दान धर्म करणे. मुक्या प्राण्यांना किंवा गरजूंना अन्नदान केल्याने पुण्य लाभते.माता लक्ष्मी आशीर्वाद देते.