Kidney Detox Drinks: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 घरगुती ड्रिंक, रोज प्यायल्यास मूत्रपिंड होईल स्वच्छ

Manasvi Choudhary

किडनी

किडनी शरीरात महत्वाची भूमिका बजावते. शरीराला नैसर्गिकरित्या शुद्ध करण्याचे काम किडनीमार्फत होते.परंतू किडनीमध्ये घाण, युरिक अॅसिड किंवा टाकाऊ द्रव्यं जमा झाल्याने किडनीला धोका पोहचतो.

kidney

किडनी डिटॉक्स ड्रिंक

यासाठी तुम्ही नियमितपणे घरगुती ड्रिंक प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते. किडनी नैसर्गिकरित्या स्वच्छ होते.

Kidney Detox Drinks

लिंबू - पाणी ड्रिंक

किडनीला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही लिंबू- पाणीचे सेवन केले पाहिजे. लिंबू मध्ये सायट्रिक अॅसिडची पातळी वाढवून मूतखडे होण्यापासून रोखते.एक ग्लास कोमट पाण्यात किंवा थंड पाण्यात अर्धा लिंबाचा रस घालून तुम्ही पिऊ शकता.

Lemon Water

ग्रीन टी

ग्रीन टी अॅटीऑक्सिडंट्स ची घटक अधिक असतात जे दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताण रोखतात. ग्रीन टी किडनीच्या पेशींना नुकसान होण्यापासून रोखते.

Green tea

क्रॅनबेरी रस

क्रॅनबेरीच्या रसामध्ये प्रोअँथोसायनिडिन्ससारखे अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे मूत्रमार्गाचे आरोग्य निरोगी राहते. क्रॅनबेरीचा रस मूत्रामार्गाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पिऊ शकता.

Cranberry Juice

बीटचा रस

बीटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि नायट्रेस भरपूर प्रमाणात असतात बेटालिन्स देखील असतात जे शरीरातील रक्त शुद्ध करते ज्यामुळे मूत्रपिंडाच्या गाळण प्रक्रियेला अधिक मदत होते.

Beetroot Juice

आवळा काढा

आवळा रक्तशुद्ध करण्यास मदत करते आणि मूत्रपिंडातील पेशींना बळकटी देण्यास मदत होते. नियमितपणे आवळ्याचा काढा प्यायल्याने शरीराची पचनक्रिया देखील सुधारते.

Amla Juice

next: Kidney Stone Problem: उन्हाळ्यात किडनी स्टोनचा धोका कोणाला होतो अधिक? काय घ्याल काळजी?

Kidney Stone Problem
येथे क्लिक करा..