Manasvi Choudhary
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यास किडनी स्टोनचा त्रास होतो. युरिनमध्ये कॅल्शियम, युरीक अॅसिड आणि ऑक्झालेट या घटकाचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन होतो.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे यामुळे किडनी स्टोनचा त्रास होत नाही.
उन्हाळ्यात शरीर थंड राहावे यासाठी अनेकजण कोल्ड ड्रिंक्स पितात मात्र कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने शरीरातील अॅसिड वाढते यामुळे मूतखडा होतो.
जास्त चहा किंवा कॉफी पिणे टाळा यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. प्रक्रिया केलेले पॅकिंगचे पदार्थ खाणे टाळावे. उन्हाळ्यात मीठाचे सेवन कमी करा.
उन्हाळ्यात जे लोक कमी पाणी पितात, किंवा ज्यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे. त्यांना किडनस्टोनचा धोका अधिक असतो.
मीठ, नॉनव्हेज पदार्थ जास्त खात असतील अश्या व्यक्तींना किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या.