OTT Releases : ओटीटी प्रेमींसाठी खुशखबर! वीकेंडची करा तयारी, 'या' आठवड्यात रिलीज होणार १० नवे चित्रपट अन् वेब सीरिज

OTT Releases (26 October-1 November) : २६ ऑक्टोबरपासून ते १ नोव्हेंबरदरम्यान ओटीटीवर अनेक नवे चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. त्यांची नावे, रिलीज डेट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म कोणते जाणून घ्या. तुम्हाला क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर आणि रोमँटिक ड्रामाचा आनंद घेता येईल.
OTT Releases (26 October-1 November)
OTT ReleasesAI PHOTO
Published On: 
Summary

'या' आठवड्यात OTT वर मनोरंजनाची मेजवानी!

क्राईम थ्रिलर, कॉमेडी, हॉरर आणि रोमँटिक ड्रामाचा आनंद घरबसल्या

१० नवे चित्रपट आणि सीरिजची यादी

ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात क्राईम थ्रिलर, कॉमेडी, रोमँटिक ड्रामा, हॉरर आणि डॉक्युमेंटरी अशा विविध प्रकारांतील चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला, जाणून घेऊया 'या' (२६ ते ३० ऑक्टोबर) आठवड्यात कोणते चित्रपट आणि सीरिज कधी व कुठे पाहता येतील.

अक्का (Akka)

प्रदर्शनाची तारीख: ३० ऑक्टोबर २०२६

OTT प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स

१९८० च्या दशकातील दक्षिण भारताची पार्श्वभूमी असलेली 'अक्का' ही एक बहुप्रतीक्षित पीरियड क्राईम थ्रिलर सीरिज आहे. पेरनुरु या काल्पनिक शहरात घडणारी ही कथा महिलांचे वर्चस्व असलेल्या एका शक्तिशाली समाजाभोवती फिरते.

ढिंढोरा सीझन १ (Dhindora Season 1)

प्रदर्शनाची तारीख: २८ ऑक्टोबर २०२६

OTT प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स

डिजिटल क्रिएटर आणि अभिनेता भुवन बाम याची लोकप्रिय कॉमेडी सीरिज 'ढिंढोरा' आहे. यात एका मध्यमवर्गीय कुटुंबाची मजेशीर, पण तितकीच अनपेक्षित कथा दाखवण्यात आली आहे.

मीठे में क्या है (Meethe Mein Kya Hai)

प्रदर्शनाची तारीख: ३० ऑक्टोबर २०२६

OTT प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साकारलेला 'मीठे में क्या है' हा चित्रपट कौटुंबिक नातेसंबंध आणि भावनांची गोष्ट मांडतो. राधिका बन्सल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिवाळीच्या वातावरणात नात्यांमधील गोडवा आणि गुंतागुंत अनुभवण्याची संधी या चित्रपटातून मिळणार आहे.

बत्था (Batha)

प्रदर्शनाची तारीख: २९ ऑक्टोबर २०२६

OTT प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स

तमिळ भाषेतील 'बत्था' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट एका कुख्यात गुंडाच्या आयुष्यात घडणाऱ्या विचित्र प्रसंगावर आधारित आहे. दिग्दर्शक बालाजी थारानीथरन यांच्या या चित्रपटात विजय सेतुपतीने बथथावचलम नावाच्या गुंडाची भूमिका साकारली आहे.

OTT Releases (26 October-1 November)
Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ नव्हे, तर बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार होता हल्लेखोरांच्या निशाण्यावर? घराजवळ केली ३ वेळा रेकी

ऑब्सेशन (Obsession)

प्रदर्शनाची तारीख: ३० ऑक्टोबर २०२६

OTT प्लॅटफॉर्म: जिओ हॉटस्टार

हॉरर आणि थरारक कथानक आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी 'ऑब्सेशन' हा चित्रपट खास ठरू शकतो. बेअर नावाचा तरुण आपल्या बालपणीच्या क्रश निक्कीला आपल्यावर प्रेम करायला लावण्यासाठी एका अलौकिक वस्तूचा आधार घेतो. मात्र, त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती भयावह बनते.

इतर नावे

  • कोलिजन कोर्स (Collision Course) - ३० ऑक्टोबर २०२६- नेटफ्लिक्स

  • यू, मी, अस (You, Me, Us) - २९ ऑक्टोबर २०२६-नेटफ्लिक्स

  • हाऊ टू रुइन दिवाली: मीट द पेरेंट्स (How to Ruin Diwali: Meet the Parents) -३० ऑक्टोबर २०२६- नेटफ्लिक्स

  • द वन अबाउट मॅथ्यू पेरी (The One About Matthew Perry) - २७ ऑक्टोबर २०२६- नेटफ्लिक्स

  • ड्राइव्ह: द प्रिटेंडर्स (Drive: The Pretenders) - २८ ऑक्टोबर २०२६- प्राइम व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com